Virar Ambedkar Jayanti News: राज्यात आंबेडकर जयंतीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात असताना गुरुवारी पालघरच्या विरार शहरात एक दुर्देवी घटना घडली. आंबेडकर जयंतीची मिरवणूक संपल्यानंतर घरी येत असताना ४ तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
तर एक तरुण जखमी झाला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना धडकीच भरली आहे. (Latest Marathi News)
घटना नेमकी कशी घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या (Virar) कारगिल नगर परिसरात बौध्दजन पंचायत समितीतर्फे गुरुवारी (१३ एप्रिल) रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. रात्री ९ वाजता निघालेली ही मिरवणूक साडेदहा वाजता संपली.
कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कार्यकर्ते घरी परतत होते. त्यावेळी मिरवणूक वाहनावर (ट्रॉली) ६ जण उभे होते. त्यावेळी वाहनावरील लोखंडी रॉडचा रस्त्यावर असलेल्या रोहित्राला स्पर्श झाला. त्यामुळे रोहित्रामधील वीजप्रवाह संपूर्ण ट्रॉलीमध्ये पसरला. त्या वीजप्रवाहामुळे वाहनावरील सहा जण होरपळले. (Breaking Marathi News)
त्यातील रुपेश सुर्वे (वय ३० वर्ष) आणि सुमित सुत (वय २३ वर्ष) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४ जण जखमी झाले. जखमींपैकी उमेश कनोजिया (वय १८ वर्ष) राहुल जगताप (वय १८ वर्ष), सत्यनारायण (वय २३ वर्ष) या तिघांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर मुंबईच्या मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल उपचार सुरू होते.
मात्र, उपचार सुरू असताना या तिघांपैकी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर अस्मित कांबळे (वय ३२ वर्ष) या तरुणाची प्रकृती स्थिर आहे. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज (Viral Video) समोर आलं आहे. फुटेज पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. या दुर्देवी घटनेनंतर परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी विरार पोलिस (Police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.