Aditya Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

Aditya Thackeray|'शिवसेना तुम आगे बढो...'; आदित्य ठाकरेंना पाहताच चिमुकल्याची घोषणाबाजी! (Video)

शिवसेनेतील बंडानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली. या बंडानंतर माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यभर दौरा सुरु केला आहे, तसेच मुंबईतही विविध ठिकाणी भेटी-गाठी सुरु केल्या आहेत.

राज्यातील महानगर पालिका तसेच नगरपरिषदांच्या निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक काही दिवसात होणार आहे. यासाठी पक्षांची तयारी सुरु आहे. आदित्य ठाकरेही मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देत आहेत. सध्या सोशल मीडियावर आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक लहान मुलगा आदित्य ठाकरे यांना पाहून घोषणाबाजी करत असल्याचा दिसत आहे.

पक्ष बांधणीसाठी आदित्य ठाकरे गणेशोत्सवात देखील मुंबईतील विविध मंडळांच्या आणि कार्यकर्त्यांच्या घरच्या बाप्पांना भेटी देत आहेत. कालही ठाकरे यांनी

आदित्य ठाकरे काल गिरगावमधील एका गणेशोत्सव मंडळाला भेट देण्यासाठी गेले होते. यावेळी एक चिमुकल्याने आदित्य ठाकरे यांना पाहिले आणि घोषमाबाजी सुरु केली. 'शिवसेना तुम आगे बढो, हम तुम्हारे' अशी घोषणा यावेळी या चिमुकल्याने दिली. चिमुकल्याच्या या कृतीने सर्वच आवाक झाले. यावेळी त्या चिमुकल्याचा उत्साह पाहून आदित्या ठाकरेंना त्या मुलाला भेटण्याची इच्छा झाली. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT