चांद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून चंद्रावर यशस्वी लँडिग केल्यानंतर आता भारताने सूर्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोसने आज आदित्य-एल 1 यशस्वीरित्या लाँच केलं आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी५७ रॉकेटद्वारे आदित्य-एल१ ने सूर्याच्या दिशेने झेप घेतली आहे. (Latest Marathi News)
या यशाचे कौतुक करावे तितके कमीच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भारताच्या भरारीचे कौतुक केले आहे. तसेच या मिशनमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग अभिमानास्पद असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विषेश उल्लेखामुळे पुण्यातील (Pune News) 'आयुका' हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यामुळे 'आयुका' संस्था आहे तरी काय? ही संस्था नेमकं काय करते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 'आयुका' ही पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली एक एक संशोधन संस्था आहे.
आयुकातील शास्त्रज्ञ खगोलशास्त्र, खगोलभौतिकी आणि भौतिकशास्त्रातील क्वांटम गुरुत्व, विश्वनिर्माणशास्त्र, गुरुत्वीय लहरी, ऑप्टिकल आणि रेडिओ खगोलशास्त्र अशा अनेक विभागात संशोधन करतात. १९८८ मध्ये जागतिक दर्जाची ख्याती असणारे खगोलशास्त्रज्ञ 'जयंत नारळीकर' यांनी अजित केंभावी व नरेश दधीच यांच्यासोबत आयुकाची स्थापना केली होती.
सर्वसाधारणपणे खगोलशास्त्रज्ञांच्या गरजा भागावण्याशिवाय ही वेधशाळा काही वेळ प्रशिक्षणासाठी आणि भारतीय विद्यापीठांमधून येणाऱ्या निरीक्षण प्रस्तावांसाठी राखून ठेवते. वेगवेगळ्या अवकाश मोहिमेत आयुकाचा मोठा सहभाग आहे. भारताच्या पहिल्या बहुतरंगलांबी विद्युतचुंबकीय लहरी टिपणाऱ्या ऍस्ट्रोसॅट या उपग्रहाने ९.३ प्रकाशवर्ष दूर असलेली दीर्घिका टिपली होती. यामध्येही आयुकाचा मोठा हातभार होता.
चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेमुळे भारताचे अवकाश संशोधनातील स्थान बळकट झाले आहे. भारत जगातील असा चौथा देश ठरला आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर प्रग्यान हे रोव्हर उतरवून भारताने विक्रमच केला आहे. पाठोपाठ आपण सुर्याच्या संशोधनाच्या दृष्टीने आज आणखी एक मोठी झेप घेतली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
आदित्य एल- १ या पहिल्याच सूर्ययानाच्या यशस्वी प्रक्षेपणामुळे आता भारत चंद्र आणि सुर्य संशोधनात कामगिरी करणारा आणि त्यामध्ये सातत्य राखणारा जगाच्या दृष्टीने महत्वाचा देश ठरला आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे चंद्रयान-२च्या एका अपयशातून बाहेर पडून, इस्त्रोने ही मोठी भरारी घेतली आहे. यापुढेही इस्त्रोची कामगिरी अशीच उंचावणारी राहील, असा विश्वासही शिंदेंनी व्यक्त केला.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.