Mission Aditya L1: आदित्य एल १ ची मोठी झेप; सूर्यावर कधी पोहचेल? मोहिमेचं बजेट किती?

Mission Aditya L1 Launch: यान सूर्याच्या निश्चित कक्षेपर्यंत कधी पोहचणार? तसेच संशोधनात कोणती माहिती समोर येणार याची माहिती जाणून घेऊ.
Mission Aditya L1
Mission Aditya L1Saam TV
Published On: 

Aditya L1 Launch:

चांद्रयानानंतर सर्व भारतीयांचे आदित्य एल १ कडे लक्ष लागले आहे. अशात नुकतेच आदित्य एल १ सूर्याच्या दिशेने झेपावलं आहे. पीएसएलव्ही सी ५७ या वाहकाच्या मदतीने आदित्य एल १ ने सूर्यावर झेप घेतली आहे. आता हे यान सूर्याच्या निश्चित कक्षेपर्यंत कधी पोहचणार? तसेच संशोधनात कोणती माहिती समोर येणार याची माहिती जाणून घेऊ. (Latest Marathi News)

आदित्य एल १ उपग्रहाचं लाँचिंग यशस्विरित्या झालं आहे. पीएसएलव्ही रॉकेटच्या तीन स्टेजमध्ये पुढे सरकलंय. आदित्य एल १ यान १७० किलोमीटर उंचीवर पोहोचलं आहे.

Mission Aditya L1
ISRO Nehru News : इस्त्रो कुणी स्थापन केली? का स्थापन केली? केव्हा स्थापन केली? एका क्लिकवर सगळंकाही

सूर्यावर कधी पोहचणार?

सूर्याकडे झेप घेतल्यावर अचूक कक्षेपर्यंत पोहचण्याचा आदित्य एल १ चा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे. या दिवसांमध्येच योग्य कक्षेपर्यंत पोहचून आदित्य एल १ उतरणार आहे.

आदित्य-L1 चे वजन किती?

आदित्य एल १ चे वजन १४८०.७ किलोग्राम इतकं आहे. आकाशात झेप घेतल्यानंतर जवळपास ६३ मिनटांनंतर रॉकेट आदित्य एल १ स्पेसक्राफ्टमधून वेगळे होईल.

Mission Aditya L1
Aditya L1 Live Streaming: भारताची सूर्याकडे आज 'हनुमान उडी'; आदित्य एल १ प्रक्षेपण कधी अन् कुठे पाहता येणार?

आदित्य एल १ चे बजेट किती आहे?

आदित्य एल १ इस्रोसाठी एक मोठं मिशन आहे. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शास्त्रज्ञ काम करतायत. काही हिंदी वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मिशनचे बजेट ४०० कोटी रुपये इतके आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com