

चांद्रयानाच्या मोठ्या यशानंतर भारत आता सूर्याच्या दिशेने झेप घेत आहे. आजपासून भारताची सूर्याभ्यास मोहीम सुरू होतेय. भरतीय अंतराळ संशोधन संघटनेचे (इस्रो)आदित्य एल १ हे यान सकाळी ११.५० वाजता सूर्याकडे झेपावणार आहे. (Latest Aditya L1 News)
सूर्याकडे झेप घेण्याचा आणि अचूक कक्षेपर्यंत पोहचण्याचा आदित्य एल १ चा प्रवास १२५ दिवसांचा असणार आहे. पीएसएलव्ही सी ५७ हे वाहक आदित्य एल १ ला अंतराळात झेप घेण्यासाठी मदत करणार आहे, अशी माहिती एस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिलीये.
आदित्य एल १ प्रक्षेपण कुठे पाहायचे?
चांद्रयानानंतर आदित्य एल-१ चे प्रक्षेपण पाहण्यासाठी जगभरातील नागरिक उस्तूक आहेत. त्यामुळे याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी इस्रोने वेगळी व्यवस्था केली आहे. इस्रोने श्रीहरिकोटा येथील केंद्रातून प्रक्षेपण दाखवण्याची सोय केलीये. प्रक्षेपण थेट पाहण्यासाठी व्ह्यू गॅलरी सीट्स बुक करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. नोंदणीसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
सूर्याकडे झेप घेण्याचा फायदा काय?
सूर्य हा पृथ्वीपासून जवळचा तारा आहे. ताऱ्यांचा अभ्यास करताना याबाबात माहिती असणे गरजेचं आहे. यामुळे आपल्याला आकाशगंगा आणि खगोलशास्त्रातील विविध माहिती मिळवण्यास मदत होणार आहे. सूर्य १५० दशलक्ष किमी दूर आहे. आदित्य एल १ निश्चित कक्षेपर्यंत पोहचल्यास सूर्याचा आणखीन अभ्यास करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.