Adani Group saam tv
मुंबई/पुणे

Adani Group: अदानी फाउंडेशन संपूर्ण भारतात उघडणार शिक्षण मंदिरे, सुरुवातीला देणार २००० कोटींची देणगी, जाणून घ्या सविस्तर माहिती

Adani Foundation: महानगरांमध्ये तसेच दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये जागतिक दर्जाच्या आणि परवडणाऱ्या शाळा उभारण्यासाठी २,००० कोटी रुपये देण्याचे निश्चित केले.

Saam Tv

मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५ : देशभरात शिक्षणाची मंदिरे उभारण्यासाठी अदाणी फाउंडेशन ने, के-१२ पद्धतीच्या खाजगी शिक्षण पद्धतीत जागतिक स्तरावर अग्रणी असलेल्या जेम्स एज्युकेशनशी सहयोग केले आहे. यासाठी अदाणी कुटुंबाने दोन हजार कोटी रुपयांची प्राथमिक देणगी दिली असून या भागीदारीतून समाजाच्या सर्व स्तरातील मुलांना परवडणारे जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाईल. अदाणी फाउंडेशन ही अदाणी समूहाची सीएसआर शाखा आहे जीचे  देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे जाळे आहे.

सेवा साधना है, सेवा प्रार्थना है और सेवा ही परमात्मा है, या अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांच्या सामाजिक तत्त्वज्ञानुसार, या भागीदारीतून संशोधन संस्थाही उभारण्यावर भर दिला जाईल. नवकल्पना आणि क्षमता वाढीमार्फत शैक्षणिक नैपुण्य उभारण्यावर, या संशोधन संस्थाचा भर असेल.

या मालिकेतील पहिली अदाणी जेम्स स्कूल ऑफ एक्सलन्स ही शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये लखनऊ येथे उभारली जाईल. त्यानंतर तीन वर्षांत अशा प्रकारच्या २० शाळा देशभरातील प्रमुखमहानगरांत आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या श्रेणीच्या शहरांमध्ये उभारल्या जातील. या शाळांमधील सीबीएसई अभ्यासक्रमाच्या ३० टक्के जागा निम्न उत्पन्न स्तरातील गुणी आणि गरजू मुलांसाठी नि:शुल्क राहतील. अदाणी समूहाची देशभरातील असलेली व्याप्ती आणि त्यांच्या पायाभूत सुविधांच्या क्षमता तसेच जेम्सच्या शैक्षणिक ज्ञानाचा फायदा घेऊन, या भागीदारीतून देशभरातील विद्यार्थ्यांसाठी परवडणाऱ्या सुनिश्चित आणि स्थायी अशा दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचा आराखडा तयार केला जाईल.

सर्व स्तरावर मान्यता असलेले जागतिक दर्जाचे परवडणारे शिक्षण देण्याचे आमचे उद्दीष्टच या उपक्रमातून दिसून येते, असे अदाणी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदाणी म्हणाले. तर, जेम्स एज्युकेशनच्या भागीदारीतून जागतिक दर्जाच्या शिक्षण पद्धती आणि डिजिटल शिक्षणाच्या नवकल्पना स्वीकारून आम्ही आपल्या देशाचे जबाबदार नेते होण्यास पुढील पिढीला सज्ज करीत आहोत.कोणाचीही सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी कशीही असली तरी प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण 

सहजपणे मिळावे हे आमचे ध्येय आहे, असे जेम्स एज्युकेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष सनी वर्की म्हणाले. अदाणी फाउंडेशनच्या सहकार्यामुळे आम्हाला आमची व्याप्ती आणि आमच्या कामांचा चांगला परिणाम वाढवण्यासाठी बळ मिळेल. त्यामुळे आमचे शिक्षण क्षेत्रातील जागतिक दर्जाचे ज्ञान भारताच्या वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.

देशाचे संक्रमण होण्यासाठी ध्येयवादी युवकांची निर्मिती करण्याची गरज असल्याचे या दोन्ही आस्थापनांच्या धुरीणांचे मत आहे. उच्च कौशल्यप्राप्त आणि मूल्यवादी ज्ञानसागर निर्माण करण्याचे उद्दिष्ट या सहयोगामुळे साधले जाईल. जागतिक अभ्यासक्रम आणि भारतातील सर्वोत्तम शिक्षण मंडळाच्या एकत्रीकरणातून अदाणी-जेम्स शाळांना फायदा होईल.

जेम्स एज्युकेशन बाबत

साठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या जेम्स एज्युकेशन ची ख्याती आता खाजगी के १२ शिक्षण पद्धतीमधील विश्वासार्ह जागतिक अग्रणी शिक्षणसंस्था अशी झाली आहे. ते शैक्षणिक उत्कृष्टतेबद्दल तसेच ध्येयवादी आणि विद्यार्थीकेंद्रित कामकाजासंदर्भात विख्यात आहेत. दर्जेदार शिक्षण सर्वांना मिळावे हे ध्येय उराशी बाळगलेल्या जेम्स एज्युकेशन तर्फे, विद्यार्थी हे आयुष्यभर ज्ञानाची उपासना करणारेच रहावेत.

तसेच कुशाग्र असे विचारवंत व्हावेत आणि वसुधैव कुटुंबकम तत्त्व अंगीकारणारे नागरिक व्हावेत, अशा प्रकारे त्यांचे सक्षमीकरण केले जाते. के १२ खाजगी शाळांचे जाळे आठ देशात असलेल्या जेम्स एज्युकेशन तर्फे १७६ राष्ट्रीयत्वाच्या एक लाख ७० हजार पेक्षाही जास्त मुलांना सर्वांगीण शिक्षण दिले जाते. गेल्या पाच वर्षात जेम्सच्या विद्यार्थ्यांना अमेरिकेच्या सर्व आठ लीग विद्यापीठांसह ५३ देशांमधील १,०५० विद्यापीठांमधून स्वीकारले गेले आहे.

अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्यावी www.GEMSEducationIndia.com

प्रसार माध्यमांकरिता संपर्क

फ्रान्सिस जोसेफ

कार्यकारी संचालक, भारत विभाग जेम्स एज्युकेशन

ई-मेल : francis.joseph@gemsedu.in

दूरध्वनी : 91 - 9821949722

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

Robotic surgery: रुग्ण मुंबईत तर सर्जन शांघायमध्ये...! ५००० किमी दूरवरून करण्यात आली भारतातील पहिली क्रॉस-बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया

भाजप कार्यकर्त्यांचा उद्रेक! संभाजीनगरमध्ये माजी मंत्र्यांची कार रोखली, काळे फासले, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: भाजपने तिकीट कापलं, कार्यकर्त्याने थेट शापच दिला

Central Railway: बदलापूर ते कर्जतदरम्यान दोन नव्या रेल्वे मार्गिका; रेल्वे मंत्रालयाने दिला ग्रीन सिग्नल; काम कधीपर्यंत पूर्ण होणार?

SCROLL FOR NEXT