Pune Crime : बायकोला शिव्या दिल्यामुळे राग, पुण्यात भावाने भावालाच पाचव्या मजल्यावरुन ढकललं, अन्...

Pune Crime : आरोपी राजू कौटुंबिक कारणावरून अमरच्या पत्नीला शिवीगाळ करत होता. घटनेच्या दिवशीही राजूने असंच केलं. यामुळे अमर आणि राजूमध्ये बाचाबाची झाली.
Pune Crime News
Pune Crime NewsSaamTV
Published On

पुणे : पुण्याच्या नांदेड सिटी पोलीस ठाणे परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने आपल्या चुलत भावाला इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून ढकलून दिले, यात त्या भावाचा जागीच मृत्यू झाला. कौटुंबिक वादातून पत्नीला शिवीगाळ केल्याच्या कारणावरून हे टोकाचे पाऊल उचलण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली असून, नांदेड सिटी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मृत आणि आरोपी भावाची माहिती

अमर देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे, तर राजू भुरेलाल देशमुख असं आरोपीचं नाव आहे. आरोपी राजू आणि अमर हे चुलत भाऊ असून, मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाटचे रहिवासी आहेत. ते कामासाठी पुण्यात आले होते. पुण्यातील धायरी परिसरातील एका सोनपापडी बनवण्याच्या कारखान्यात दोघेही काम करत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता.

Pune Crime News
Mumbai: मुंबईत 'सिंगापूर' उभारणार; MMRDA चा मास्टर प्लान

भांडणानंतर टोकाचे पाऊल

आरोपी राजू कौटुंबिक कारणावरून अमरच्या पत्नीला शिवीगाळ करत होता. घटनेच्या दिवशीही राजूने असंच केलं. यामुळे अमर आणि राजूमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यावर अमर राजूला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेला, पण झटापटीत राजूने अमरला पाचव्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यात अमरचा जागीच मृत्यू झाला.

ही घटना धायरी परिसरातील कपील अपार्टमेंटमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच नांदेड सिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी आरोपी राजूला अटक केली. त्याच्यावर हत्येसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून झालेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Pune Crime News
Bhiwandi Crime: वाद उत्तर प्रदेशमध्ये, भिवंडीत घेतला बदला, गर्लफ्रेंडच्या मदतीने फसवलं अन् घेतला जीव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com