
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मुंबईत अनेक नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यात येत आहे. यामुळे मुंबईचं रुपडं पालटणार आहे. मुंबई महानगर प्रदेशाला विकसित करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.या कामााठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. एमएमआरडीएने एमएमआरच्या विकासासाठी एका मास्टर प्लान तयार केला आहे. या मास्टर प्लानमध्ये गृहनिर्माण क्षेत्रावर विशेष भर देण्यात आला आहे.
सिंगापूरप्रमाणेच मुंबई विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आहे. गृहनिर्माण क्षेत्र विकसित करण्याची योजना आखली आहे. यासाठी एमएमआरमध्ये बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील ३० ते ४० टक्के घरे भाड्याने घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.
भाड्याने घेणाऱ्यांसाठी घरे राखीव ठेवण्याबरोबरच घरांचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे.४०० चौरस फूट घराचे भाडे १५ हजार रुपयांपेक्षा जास्त जास्त नसणार आहे. तर घरांची किंमत २० लाखांपेक्षा कमी असावी, असं म्हटलं आहे. मेट्रो आणि रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या परवडणारी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.
सिंगापूर हेदेखील विकसित होणारे शहर आहे. सिंगापुरमधील ८२ टक्के लोक हे सरकारी घरात राहतात. येथे जगभरातील अनेक लोक नोकरी, शिक्षणासाठी जातात.येथे ज्या महिला एकट्या राहणाऱ्या महिलांसाठी भाड्यानेदेखील घरे दिली जातात. नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन सिंगापूरसारख्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. मुंबई हे जगातील सर्वात महागडे शहर आहे. मु्ंबईतील नागरिक आपल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम ही घराच्या भाड्यासाठी खर्च करतात. इतर शहरातील लोक फक्त ३० ते ३५ टक्के रक्कम घराच्या भाड्यासाठी वापरली जाते.त्यामुळेच एमएमआरच्या विकासासाठी रेंटल हाउसिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.