Narendra Modi : ‘मोदी-अदाणी भाई भाई’ मोदी भाषणाला उभे राहताच विरोधकांची जोरदार घोषणाबाजी, पाहा VIDEO

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषणाला उभे राहताच, विरोधकांनी याचं मुद्द्यावरून मोदी अदानी भाई भाई अशा घोषणा दिल्या.
Narendra Modi Speech in Rajya Sabha
Narendra Modi Speech in Rajya SabhaSaam TV

Narendra Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतमी अदाणी यांच्यात संबंध आहेत. गौतमी अदाणी यांनी भाजपला पैसे पुरवले आहेत, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला होता. त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली असून संसदेतही याचे पडसाद उमटत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषणाला उभे राहताच, विरोधकांनी याचं मुद्द्यावरून मोदी अदानी भाई भाई अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मोठा गदारोळ निर्माण झाला होता. (Latest Marathi News)

Narendra Modi Speech in Rajya Sabha
Aditya Thackeray News: आदित्य ठाकरेंची आज तोफ धडाडणार; मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणार की टीका करणार?

नेमकं काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिषाणावर बोलण्यासाठी उभे राहिले होते. मोदी यांनी आपल्या भाषणास सुरूवात करताच, विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मोदी-अदानी भाई-भाई, जी फॉर जीपीएस अशा घोषणा विरोधकांनी दिल्या.

त्यामुळे सभागृहात काही काळ गदारोळ निर्माण झाला होता. दरम्यान, विरोधकांच्या या आक्रमकपणामुळे मोदी यांना भाषण करताना अडथळा निर्माण होत होता. मात्र तरी देखील पंतप्रधान मोदी सभापतींना उद्देशून भाषण करत राहिले.

राहुल गांधी यांचे आरोप काय?

सध्या संसदेचे बजट सत्र सुरु आहे. या सत्राच्या सहाव्या दिवशी म्हणजेच बुधवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी गौतम अदानी मुद्यावर ५० मिनिट बॅटिंग केली. अदानी यांचा श्रीमंतांच्या यादीतील चढता आलेख थक्क करणारा असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. अदानी आणि पीएम मोदी यांच्यात काय संबंध आहे? असा सवाल करत त्यांनी मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केले. याशिवाय अदानी हे भाजपला पैसे पुरवत असल्याचा आरोप देखील राहुल गांधी यांनी केला.

इतकंच नाही तर, यापूर्वी अदानी यांच्या विमानातून पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवास करत होते. त्यानंतर आता अदानी पंतप्रधान मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. पंतप्रधानांच्या विदेशी दौऱ्यात अदानी किती वेळा होते, असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरण आणि हेतूवर शंका उपस्थित केली.सार्वजनिक क्षेत्रातील बँका, एसबीआय, पीएनबी आणि इतर बँकांनी अदानी यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप केले. एलआयसीचा पैसा ही अदानी यांना देण्यात आला. या सर्व श्रृंखलावर देखील राहुल गांधी यांनी बोट ठेवले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com