BRIBERY CASE OFFICIAL CAUGHT RED HANDED TAKING 5 LAKH ACB ACTION Saam Tv
मुंबई/पुणे

Vasai-Virar: मोठी कारवाई! महिला महसूल अधिकाऱ्याला अटक, लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Palghar ACB Big Action: पालघरमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली. महिला महसूल अधिकाऱ्याला अटक करण्यात आली. त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली.

Priya More
  • महिला महसूल अधिकारी लाच घेताना अटक

  • पालघरमध्ये एसीबीची मोठी कारवाई

  • महसूल विभागातील भ्रष्टाचार प्रकरण समोर

  • वसई- विरार लाचलुचपत कारवाई

मनोज तांबे, वसई

पालघरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना पोलिसांनी अटक केली. ४५ हजारंची लाच घेताना महिला अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. सध्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पेल्हार ग्रामपंचायतच्या ग्राम महसूल अधिकारी उज्वला प्रवीण पाटील यांना ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. सोमवार ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या उज्वला प्रवीण पाटील यांची चौकशी केली जात आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने केलेल्या रूम बांधकामाचा पंचनामा न करण्यासाठी उज्वला पाटील यांनी ४५ हजार रुपयांची मागणी केली होती. तसेच मौजे बिलालपाडा येथील सर्व्हे क्रमांक १३/०३ या जमिनीवर करण्यात आलेल्या माती भरणीच्या पंचनाम्यासंदर्भात १ लाख ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण १ लाख ९५ हजार रुपयांची लाच मागण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने पडताळणी करून सापळा रचला. त्यानुसार लाचेच्या रकमेचा पहिला हप्ता म्हणजे ४५ हजार रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने उज्वला प्रवीण पाटील यांना रंगेहाथ पकडले.

याप्रकरणी पेल्हार पोलिस ठाण्यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वसई-विरार शहर परिसरातील ग्रामपंचायती तसेच तलाठी कार्यालयांमध्ये या कारवाईची जोरदार चर्चा सुरू असून एसीबीच्या धडक कारवाईमुळे महसूल विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१००० अनधिकृत चाळी, ६००कोटींची उलाढाल; चाळ माफिया आणि अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Maharashtra News Live Update: वादळी वाऱ्याचा फटका; छत्रपती संभाजीनगर विमानतळाचे छप्पर कोसळले, मोठी दुर्घटना टळली

काय वेळ आलीय! पेट्रोल पंपावर पोलीस बंदोबस्त, कॅनमध्ये डिझेल देण्यास आजपासून बंदी, VIDEO

Mumbai Crime News: किरकोळ कारणावरून जोडप्यात वाजलं; वादातून पतीनं पत्नीच्या पोटात लाथ मारली अन्... होत्याचं नव्हतं झालं

Vinchu Home Remedies : घरात विंचू येण्याने त्रस्त आहात? हे ४ उपाय करतील कायमचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT