Pune Bribe News : पुण्यात खळबळ! घरकुल योजनेसाठी लाच घेताना अधिकारी जाळ्यात; ACB ची मोठी कारवाई

Pune Bhor Bribery News : भोर तालुक्यात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला ACBने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे ग्रामीण भागातील भ्रष्टाचार पुन्हा समोर आला आहे.
GRAM SEVAK CAUGHT TAKING ₹15000 BRIBE IN PUNE ACB TRAP
GRAM SEVAK CAUGHT TAKING ₹15000 BRIBE IN PUNE ACB TRAPAI Image
Published On
Summary
  • भोर तालुक्यात ग्रामसेवक लाच घेताना ACBकडून रंगेहाथ पकडला

  • घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी १५ हजारांची मागणी

  • तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ACBने सापळा रचला

  • घटनेमुळे शासकीय यंत्रणेवरील विश्वासावर प्रश्नचिन्ह

सचिन जाधव, पुणे

पुण्यातील भोर तालुक्यात महुडे खोऱ्यात मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक (ACB ) ने मोठी कारवाई केली आहे. शिंद आणि गवडी गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे यांनी घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शासनाच्या घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत. घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवक सालगुडे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली होती. शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्याने त्रस्त झालेल्या तक्रारदाराने पुणे येथील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.

GRAM SEVAK CAUGHT TAKING ₹15000 BRIBE IN PUNE ACB TRAP
Shocking : भयंकर! अघोरी पूजेच्या नावाखाली जोडप्याची हत्या, मृतदेह मठ परिसरात लपवले; भोंदू बाबाच्या खुनी चेहऱ्याचं काळं सत्य समोर

तक्रारीची प्राथमिक पडताळणी केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. त्यानुसार मंगळवारी भोलावडे–शिंद मार्गावर ठरलेल्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवक सालगुडे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा रंगली असून अनेक नागरिकांनी एसीबीच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

GRAM SEVAK CAUGHT TAKING ₹15000 BRIBE IN PUNE ACB TRAP
Electricity Saving Tips : उन्हाळ्यात सतत AC चालवला तरी वीजबिल येईल कमी? वापरा या ट्रिक्स

घरकुलासारख्या गरजू नागरिकांसाठी असलेल्या योजनेतही लाच मागितली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी सामान्य नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. या घटनेमुळे शासकीय यंत्रणेवरील विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com