- अक्षय बडवे
शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतू (sewri nhava sheva trans harbour link) या सागरी सेतुला राजमाता जिजाऊ (rajmata jijau) माँ साहेबांचे नाव द्यावे अशी मागणी अभिजीत बिचुकले (abhijeet bichukale) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे केली आहे. (Maharashtra News)
येत्या १२ जानेवारीला राजमाता जिजाऊ यांची जयंती (rajmata jijau jayanti) आहे. या दिवशी शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूला राजमाता जिजाऊ सेतू असे नाव दिले तर खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली देणं होईल असं अभिजीत बिचुकले यांनी मत व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात बिचुकलेंनी राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंमुळे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज मिळाले त्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर फक्त राजकारण केले जात आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा वैचारिक वारस म्हणून शिवडी ते न्हावा शेवा सागरी सेतूला राजमाता माॅं साहेब जिजाऊ सागरी सेतू असे नाव द्यावे अशी मागणी करीत आहे. हे नामकरुन करुन राजमातांना ख-या अर्थाने सरकारकडून आदरांजली द्यावी. तसेच राजामाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रेम प्रदर्शित करावे असेही बिचुकलेंनी पत्रात नमूद केले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.