Aayush Komkar Case saamtv
मुंबई/पुणे

Aayush Komkar Case: आयुष कोमकर प्रकरणात मोठा ट्विस्ट, हत्येसाठी बंदूक कुणी दिली? नाव आलं समोर

Aayush Komkar Case Update: आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आयुषला संपवण्यासाठी कुणी बंदूक दिली त्याचे नाव समोर आले आहे. या प्रकरणात १३ आरोपी तुरुंगात आहे. यासर्वांची पोलिस चौकशी सुरू आहे.

Priya More

Summary -

  • आयुष कोमकर हत्येसाठी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरने दिल्याचं उघड झाले.

  • आरोपी अमन पठाण आणि सुजल मिरगू यांचा पोलिसांसमोर कबुली दिली.

  • प्रकरणातील सर्व १३ आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आे.

  • संपूर्ण आंदेकर कुटुंब या प्रकरणी जेलमध्ये आहे.

पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली पिस्तूल कुणी दिली याचे नाव आता तपासातून समोर आले आहे. आरोपींनी पोलिसांसमोर कबुली दिली. या प्रकरणात नुकताच पोलिस ठाण्यात शरण आलेल्या कृष्णा आंदेकर याने पिस्तूल दिली असल्याची माहिती समोर आली आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणाने पुणे हादरले आहे. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी नानापेठेमध्ये आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती.

आयुष कोमकर हत्या प्रकरणात कृष्णा आंदेकरची भूमिका आता स्पष्ट झाली आहे. आयुष कोमकरच्या हत्येसाठी वापरलेले पिस्तूल कृष्णा आंदेकरने दिल्याची कबुली मारेकरी अमन पठाण आणि सुजल मेरगू यांनी पोलिसांसमोर दिली आहे. फरार असताना त्याने पुरावे नष्ट केले का? कोणाशी संपर्क ठेवला होता का? याचा तपास सुरू आहे.

पोलिस तपासात कृष्णा हा कट रचणाऱ्या आरोपींमधील प्रमुख लिंक असल्याचा संशय आहे. पोलिसांनी एन्काऊंटरची धमकी दिल्यानंतर कृष्णा आंदेकर पोलिस स्वतःहून पोलिस ठाण्यात शरण आला. कृष्णाला न्यायालयाने १८ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी आता चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात आहेत. आयुष कोमकर हत्या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली आहे. संपूर्ण आंदेकर कुटुंब या प्रकरणी जेलमध्ये आहे.

दरम्यान, आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंदेकर १६ सप्टेंबर रोजी सकाळी समर्थ पोलिसांना शरण आला. या हत्या प्रकरणातील सर्व १३ आरोपीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकर, शिवम आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर, लक्ष्मी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, अमन पठाण, यश पाटील, अमित पाठोळे आणि सुजल मिरगू हे सर्व जण या प्रकरणात तुरूंगात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

Mumbai News: भयाण! अंगभर मुंग्या, भूकेने व्याकूळ बालिकेची जीवनासाठी झुंज; दोन ट्रॅव्हल्सच्यामध्ये सापडली नवजात बालिका

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT