Mumbai BJP Office Police Security  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai News: मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढवली;पोलिसांचा तगडा बंदोबस्त, नेमकं कारण काय?

Mumbai BJP News: मुंबईत देखील आम आदमी पक्षाकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Satish Daud

सूरज मसुरकर, साम टीव्ही मुंबई

Mumbai BJP Office Police Security

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी (ता. २१) ईडीच्या पथकाने अटक केली. यावरून आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहे. मुंबईत देखील आम आदमी पक्षाकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या मुंबईतील कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर शुक्रवारी पहाटेपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव पोलीस दल आणि मुंबई पोलिसांचे पथकातील शेकडो अधिकारी तसेच कर्मचारी भाजप कार्यालयाबाहेर तैनात आहेत. (Breaking Marathi News)

कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहेत. दुसरीकडे दिल्लीतही आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी रात्रीपासून पोलिसांनी आपच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

'आम्हाला केजरीवालांच्या सुरक्षेची काळजी'

सध्या अरविंद केजरीवाल ईडीच्या ताब्यात असून त्यांच्या सुरक्षेबाबत आपच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अरविंद केजरीवाल यांना Z+ सुरक्षा कवच आहे. आता ते केंद्र सरकारच्या ईडीच्या ताब्यात आहे. पण, त्यांच्या सुरक्षेबाबत आम्हाला काळजी आहे. असे मत मंत्री अतिषी यांनी ट्विटरवर व्यक्त केलंय.

'व्यक्तीला अटक कराल, विचाराला कसे कैद कराल?'

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी देखील नाराजी व्यक्त करत भाजपवर निशाणा साधला आहे. तुम्ही अरविंद केजरीवाल यांना अटक कराल पण त्यांच्या विचाराला तुम्ही कसे कैद कराल. केजरीवाल ही एक व्यक्ती नसून, तो एक विचार आहे आणि आम्ही आमच्या नेत्याच्या पाठीशी गंभीरपणे उभे आहोत, अशी पोस्ट भगवंत मान यांनी ट्विटरवरून केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Trekking Tips : ट्रेकिंगला जात असाल तर या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा

Happy Patel: आमिर खानच्या 'हॅपी पटेल'मधून डीके बोसची जोडी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; इमरान खान करणार कमबॅक? पाहा ट्रेलर

Fitness Mistakes: दररोज १०००० पावलं चालताय, पण रिझल्ट झिरो! संशोधनातून ही ५ कारणं आली समोर

Maharashtra Politics: आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा|VIDEO

Maharashtra Live News Update: मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उद्या मतदान

SCROLL FOR NEXT