बिहारच्या सुपौल येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास गर्डर कोसळला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ७ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बिहारच्या सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान देशातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाची लांबी जवळपास ११ किलोमीटर इतकी असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता. २२) पहाटे काम सुरू असताना अचानक पुलाच्या ५०, ५१ आणि ५२ क्रमांकाच्या पिलरचे गर्डर उखडून खाली कोसळले. (Breaking Marathi News)
यामध्ये जवळपास २० मजूर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत ८ मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे. यातील ८ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या इतर मजुरांचा जीव वाचवण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहेत. घटनास्थळी मजुरांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली असून आक्रोश सुरू केला आहे.
अजूनही १४ मजूर पुलाच्या गर्डरखाली दबले असल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे. हा पूल कोसी नदीच्या मध्यभागी बनवला जात असल्याने याठिकाणी बचावासाठी पुरेशी उपकरणे पोहोचू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जखमींना मदत आणि बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
पुलाचे बांधकाम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे केले जात असून मजुरांच्या सुरक्षितेसाठी कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही. त्यामुळे आम्ही याला विरोध केला होता, पण आमचं कुणीही ऐकलं नाही, असं स्थानिकांनी म्हटलं आहे. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीसोबत संपर्क साधल जात असल्याचं सुपौलचे डीएम केशल कुमार यांनी सांगितलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.