Navi Mumbai Latest News  Saam TV
मुंबई/पुणे

Navi Mumbai Couple: नवी मुंबईच्या AC बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या कपलवर कारवाई; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अटक

Couple Caught in physical Act on NMMTs AC Bus in Navi Mumbai: एनएमएमटीच्या वातानुकूलित बसमध्ये एका जोडप्याने सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

Bhagyashree Kamble

नवी मुंबईतील एनएमएमटीच्या वातानुकूलित बसमध्ये एक जोडपं सेक्स करताना आढळून आले आहे. एका व्यक्तीने धावत्या बसमध्ये जोडप्याची सुरू असलेली रासलीला पाहुन व्हिडिओ शूट केला, तसेच व्हायरलही केला. व्हायरल झाल्यानंतर हा व्हिडिओ एनएमएमटी प्रशासनापर्यंत पोहोचला. यासंदर्भात बसचालक आणि कंडक्टरवरही कारवाई करण्यात आली आहे. तसेच तरूण आणि तरूणीला अटक करण्यात आलीय. मात्र, त्यांना जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नवी मुंबईतील वातानुकूलित एसी बसमध्ये जोडप्याने केलेल्या कृत्यामुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर कंडक्टरविरधात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, असे एका अधिकाऱ्याने गुरूवारी सांगितले. कामोठे पोलीस ठाण्याने भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अतंर्गत या जोडप्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

जोडप्याविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना लगेच जामिनावर सोडण्यात आले आहे. कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्यास तीन महिने तुरूंगवास किंवा १००० रूपये दंड होऊ शकतो. मात्र, अटक केल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पनवेलहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या एका एनएमएमटी बसमध्ये एक जोडपं अश्लील कृत्य करत होते. ही बस एका चौकात उभी राहिली. त्यानंतर एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ शूट करून शेअर केला. या व्हिडिओमध्ये हे जोडपं सेक्स करत असताना स्पष्ट दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बसच्या कंडक्टरविरोधात कारवाईला सुरूवात करण्यात आली. सतर्क न राहिल्याबद्दल आणि हस्तक्षेप न केल्याबद्दल कंडक्टरची चौकशी केली जात आहे. चौकशी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारामतीत अवकाळी पावसाला सुरुवात

Actress Khushi Mukherjee: कारला धडकली दुसऱ्याची गाडी; अभिनेत्री फटाके विक्रेत्यावरच संतापली; भररस्त्यात अभिनेत्री मुखर्जीचा राडा

Saam Impact: धुळ्यात दूध भेसळ! साम टीव्हीच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग, FDAच्या अधिकाऱ्यांची कारवाईसाठी धावपळ|VIDEO

PM Kisan Update : पीएम किसान योजनेचे २००० रुपये खात्यात कधी जमा होणार? कोट्यवधी शेतकऱ्यांना दिवाळीत मिळाली गोड बातमी

Rupali Bhosle Photos: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

SCROLL FOR NEXT