NCP: ठाकरे बंधूंनंतर पवार कुटुंबही एकत्र येणार? नेत्याकडून पहिली टाळी, थेट युतीचे संकेत

Thackeray alliance pawar family reunion Rohit Pawar statement: एप्रिल महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चार वेळा बैठक झाल्या असून, कुटुंबीयांमधील संवाद वाढल्याचं दिसत आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी केलेलं सूचक विधान अधिक चर्चेत आलं आहे.
 Ajit Pawar and Sharad Pawar
Sharad Pawar And Ajit Pawar Meeting Saam Tv
Published On

मनसे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राज्यातील प्रमुख नेते एकत्र येणार असल्याची चर्चा शनिवारपासून रंगली आहे. राज ठाकरेंनी घातलेली साद आणि उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद यामुळे युती होणं निश्चित असल्याचं काही नेते मंडळींनी म्हटलंय. आता पवार कुटुंबाचं मनोमिलन होणार का? याकडे सगळ्याचं लक्ष आहे. कारण एप्रिल महिन्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्यात चार वेळा बैठक झाल्या. त्यामुळे कुटुंबीयांमधील संवाद वाढल्याचं चित्र दिसून येत आहे. अशातच आमदार रोहित पवार यांनी केलेलं सूचक विधान अधिक चर्चेत आलं आहे.

कुटुंब एकत्र येणं काळाची गरज

शरद पवार आणि अजित पवार यांच्यात मनोमिलन होणार का? या प्रश्नावर रोहित पवार यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

'आपली भारतीय संस्कृती आपल्याला एकत्र राहण्याचे संदेश देते. कुटुंब एक संघ असावं. हेच संस्कृतीचं मूळ आहे. पवार कुटुंबही एक आहे. काही लहानसहान मतभेद असतील तर, ते मिटवून एकत्र यावं, भेटून एकजुटीनं काम करायला हवं', असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

 Ajit Pawar and Sharad Pawar
Pahalgam Attack: भारत सरकारकडून 'करारा जवाब'; पाकिस्तानविरोधात केला डिजिटल स्ट्राइक

तसेच 'शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार या ज्येष्ठ नेत्यांनी यावर काय भूमीका घ्यायची हे तेच ठरवतील. मात्र, वैयक्तिक मत म्हणून मला वाटतं की, आपलं कुटुंब अजून मजबूत होऊन एकत्र यायला हवं', अशी मनातील इच्छाही रोहित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली.

 Ajit Pawar and Sharad Pawar
Dr. Valsangkar News: डॉ. वळसंगकरांनी बाथरूममध्ये गोळी झाडली, पिस्तूल मात्र बेडवर; पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर

शरद पवार आणि अजित पवार यांच्या मनोमिलनची चर्चा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाच्या साखरपुड्याला सर्व पवार कुटुंब एकत्र आलं होतं. नंतर अनेक वेळा शरद पवार आणि अजित पवार यांनी मिळून अनेक बैठकांमध्ये एकत्र उपस्थिती दर्शवली. त्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन होणार का? ठाकरे बंधूंनंतर काका - पुतणे एकत्र येण्याची शक्यता आहे का? असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com