Dr. Valsangkar News: डॉ. वळसंगकरांनी बाथरूममध्ये गोळी झाडली, पिस्तूल मात्र बेडवर; पोलिसांच्या तपासात नवी माहिती समोर

Dr. Shirish Walsangkar News: न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण अधिकच गूढ बनत चाललं आहे. बाथरूममध्ये गोळी झाडून आत्महत्या केल्याचं चित्र असलं तरी, पिस्तूल मात्र बेडरूममध्ये आढळून आले आहे.
Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale
Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh MusaleSaam Tv News
Published On

न्युरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचं प्रकरण अधिकच गूढ बनत चाललं आहे. वळसंगकरांनी बाथरूममध्ये गोळ्या झाडून आत्महत्या जरी केली असली तरी, मात्र पोलीस तपासात पिस्तूल बेडरूममध्ये सापडली आहे. तसेच आरोपी मनिषा मुसळे माने हिचा माफीनामा देखील बेडरूममध्ये सापडलेला आहे. संशयाची सुई मनिषा यांच्याकडे वळली पाहिजे म्हणून तर पिस्तूल ठेवली नसेल ना? असा काही हेतू आरोपीचा होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ वृत्तपत्राला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी त्यांच्या खोलीची तपासणी केली. वळसंगकरांच्या खोलीत अनेक वस्तू सापडल्या आहेत. बाथरूममध्ये काडतूस, गोळीची पुंगळी, नॅपकिन, बुलेटवरील तांब्याचे आवरण, बुलेटमधील शिसे अशा काही वस्तू सापडल्या आहेत. पण ज्या पिस्तूलीतून त्यांनी स्वत:वर गोळी झाडली, ती पिस्तूल मात्र, बेडरूममध्ये सापडली आहे.

Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale
Pahalgam: 'माझं नाव भारत अन् मी हिंदू', मुलाला पत्नीकडं द्यायला सांगितलं आणि धाडधाड गोळ्या झाडल्या

तसेच मनिषा मुसळे माने या आरोपी महिलेचा माफिनामा बेडरूममध्ये पिस्तूलजवळ सापडला आहे. तसेच पिस्तूलसोबत एक पेनड्राईव्ह, २ मोबाईलही सापडले आहेत. या वस्तूंचा सखोल तपास अद्याप पोलिसांकडून करण्यात आलेला नाही. या वस्तू तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत.

Solapur Dr Shirish Valsangkar death case Manisha Mahesh Musale
धावत्या AC बसमध्ये कपलचे शरीरसंबंध, बस कंडक्टर गोत्यात, २२ सेकंदाचा VIDEO व्हायरल; नवी मुंबईत धक्कादायक प्रकार | Navi Mumbai

आर्थिक व्यवहारातून कट रचल्याची माहिती

मनिषा माने या आरोपी महिलेला अटक केल्यानंतर पोलिसांनी रूग्णालयातील सुपरवायझर, अकाऊंटंट आणि कॅशियरसह काही कर्मचाऱ्यांची चौकशी केली. रूग्णालयाने वस्तू खरेदी केल्यावर मनीषा वाढीव बिल सादर करून पैसे उकळत होती. ही बाब वळसंगकर यांना समजल्यानंतर त्यांनी, परवानगीशिवाय कोणताही व्यवहार न करण्याच्या सुचना रूग्णालयातील प्रशासनाला दिल्या.

त्यानंतर मनिषा या महिलेच्या वागणुकीत काही बदल घडले. याच अनुषंगाने पोलिसांनी रूग्णलयातील कर्मचाऱ्यांची तसेच कार्यालयाची झडती घेतली. काही कागदपत्रेही जप्त केले. या हत्येमागे आर्थिक गैरव्यवहाराचे तर कारण नसणार ना? याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com