Palghar News, Talasari Fishermen saam tv
मुंबई/पुणे

Palghar News : तलासरी, डहाणूतील मच्छिमारांची पाकच्या तुरुंगातून सुटका

त्यांना वाघा बॉर्डरहून पंजाब आणि त्यानंतर गुजरात राज्यातील वेरावळ येथे आणण्यात आले.

रुपेश पाटील

Palghar News : पाकिस्तानातून सुटका झालेल्या 198 भारतीय खलाशांपैकी पाच जण हे पालघर जिल्ह्यातील आहेत. आज (बुधवार) ते त्यांच्या मूळ गावी पोहचले. यावेळी कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण हाेते. (Maharashtra News)

पाकिस्तानच्या लांडी तुरुंगातून 11 मे रोजी या पाचही खलाशांना सोडण्यात आले होते. या पाच खलाशांमध्ये जयवंत जाना पाचालकर ,जितेश जयवंत पाचालकर, विलास महादू कोंढारी हे तीन खलाशी (palghar) तलासरी तालुक्यातील आहेत. तर जितेश राघू दिवा, अर्जुन काकड्या डावऱ्या हे दोन खलाशी डहाणू तालुक्यातील आहेत.

यामध्ये पाचालकर पिता पुत्रांचा समावेश असून हे दोघेही डिसेंबर 2019 पासून शिक्षा भागवत होते. त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांना वाघा बॉर्डरहून पंजाब आणि त्यानंतर गुजरात राज्यातील वेरावळ येथे आणण्यात आले.

सोमवारी रात्रीपर्यंत या खलाश्यांची चौकशी पूर्ण केल्यानंतर त्यांना बोट मालकाकडे सोपविण्यात आले. आज (बुधवार) हे पाचही खलाशी आपली शिक्षा भोगून आपल्या घरी पोहोचले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मित्रांची टोळी जमवा अन् रात्री मुंबई फिरा! 'ही' ७ ठिकाणे नाईट आउटसाठी एकदम खास

EPS Pension Hike: वेज सीलिंग वाढल्यास मिळणार ₹12,500 पेन्शन? वाचा संपूर्ण गणित

Maharashtra News Live Update: गडचिरोली - वडसा परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात

Political News: मोठी बातमी! माजी खासदाराविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

सुट्टीच्या दिवशी पोलीस दलात मोठा भूकंप! 7 IPS, 39 अधिकाऱ्यांच्या बदल्यांनी खळबळ

SCROLL FOR NEXT