आदर्श शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्यमंत्री मंडळाकडून ४९४ कोटींचा निधी! SaamTV
मुंबई/पुणे

आदर्श शाळांचा कायापालट करण्यासाठी राज्यमंत्री मंडळाकडून ४९४ कोटींचा निधी!

राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यामध्ये २१ व्या शतकातील नवनवीन कौशल्ये विकसित व्हावीत, पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात.

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : राज्यातील सर्व मुलांना समान गुणवत्तापूर्ण सर्वोच्च दर्जाचे शिक्षणEducation मिळावे, त्यांच्यामध्ये २१ व्या शतकातील नवनवीन कौशल्ये विकसित व्हावीत, पाठ्यपुस्तकाच्या मर्यादेपलीकडे जाऊन शिकणे आणि शिकविणे या दोन्ही क्रिया घडाव्यात, शिक्षणाच्या प्रती समाज सक्रीय व्हावा, सरकारी शाळांबद्दलGoverment School पालकांचा विश्वास वाढावा, पटसंख्या वाढावी या सर्व हेतूने राज्यातील शासकीय शाळांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनामार्फत आदर्श शाळांची निर्मिती करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला असून सदर शाळांची गुणवत्ता उंचावण्याच्या दृष्टीकोनातून आज राज्यमंत्रीमंडळामध्ये दिनांक ५ मार्च २०२१ च्या शासन निर्णयान्वये पहिल्या टप्प्यातील निवड करण्यात आलेल्या ४८८ शाळांसाठी ४९४ कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.494 crore from the state cabinet for schools

हे देखील पहा-

आदर्श शाळांचे बांधकामConstruction करण्यासाठी आवश्यक १०० कोटी इतका निधी ई गव्हर्नंसच्याe-Governance निधीमधून सन २०२०-२१ या वर्षासाठी उपलब्ध नियतव्ययामधून पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उर्वरित रुपये ३९४ कोटी इतका निधी विहित तरतुदीनुसार अर्थसंकल्पामधून किंवा पुनर्विनियोजनाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर आदर्श शाळा विकसित करण्यासाठी नवीन लेखाशीर्ष उघडण्यात येणार आहे. तसेच सदर शाळांचे बांधकाम समग्र शिक्षा अभियानाच्या यंत्रणेमार्फत करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिली.

राज्यातील बहुजनांच्या मुलांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवून देण्यासाठी राज्यशासन कटीबद्ध आहे. याचाच एक भाग म्हणून आदर्श शाळा योजनेअंतर्गत विशिष्ट निकषांच्या आधारे शाळांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वाढता लोक सहभाग, भविष्यात वाढती पटसंख्या व किमान १००, १५० पटसंख्या, शालेय प्रांगणात अंगणवाडी (पूर्व प्राथमिक वर्ग) उपलब्धी, आकर्षक शाळा इमारत, विद्यार्थीसंख्येनुसार वर्ग खोल्या, मुलां-मुलींकरीता आणि CWSN साठी स्वतंत्र व पुरेशी स्वच्छता गृहे, पेयजल सुविधा व हँड वॉश स्टेशन, मध्यान्ह भोजनाकरिता स्वयंपाकगृह व भांडार कक्ष, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, ग्रंथालय/वाचनालय, संगणक कक्ष, virtual class room ची सुविधा, विद्युतीकरण सुविधा, शाळेला संरक्षक भिंत, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून शाळेतील fire extinguisher सह energency exit ची उपलब्धता, परिसरातील शाळेमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था उपलब्धता, इयत्ता ५ वी शिष्यवृत्तीscholarship परीक्षा तयारी इत्यादी निकषांचा यामध्ये समावेश आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या उद्देशाने या आदर्श शाळा विकसित करण्यात येतील असे सांगितले. आदर्श शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे या दृष्टीने सुसज्ज भौतिक सुविधांची उपलब्धी, वर्गखोल्या, संगणकीकरण,शाळा दुरुस्ती, शैक्षणिक साहित्य इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सदर निधीचा विनियोग करण्यात येणार आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : मविआ ही कोविडच्या काळात मलिदा खाणारी गॅंग; फडणवीस यांची घणाघाती टीका | Marathi News

Maharashtra News Live Updates: भाजप उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा

Chhagan bhujbal : ऐन विधानसभा निवडणुकीत छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात पुन्हा जुंपली

Manoj Jarange News : आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा; जरांगेंचा नाव न घेता भुजबळांवर फटकेबाजी

12th Student Suspended : युट्यूबवर पाहून बॉम्ब बनविला आणि थेट शिक्षकाच्या खुर्चीखाली केला विस्फोट, बारावीतल्या विद्यार्थ्यांचा कारनामा

SCROLL FOR NEXT