किरीट सोमय्यांनी, बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात छगन भुजबळांवर केले मोठे आरोप! (पहा व्हिडिओ)

मुंबईत सांताक्रुझला भुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत पुर्ण भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगशी त्यांचा संबंध काय? असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्यांनी, बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात छगन भुजबळांवर केले मोठे आरोप! (पहा व्हिडिओ)
किरीट सोमय्यांनी, बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात छगन भुजबळांवर केले मोठे आरोप! (पहा व्हिडिओ)SaamTV
Published On

नाशिक : महाराष्ट्र सदनासह बेहिशेबी मालमत्तेवरून राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांच्यावर दाखल प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच छगन भुजबळ आता भाजप BJP नेते किरीट सोमय्याKirit Somaiya यांच्या रडारवर आले आहेत. किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्येNashik भुजबळांच्या मालमत्तेचीproperty पाहणी करून भुजबळांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे भुजबळ विरुद्ध सोमय्या संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.Kirit Somaiya has made big allegations against Chhagan Bhujbal

पहा व्हिडीओ-

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज नाशकात येऊन छगन भुजबळांना आव्हान दिलं आहे. नाशिकमधील भुजबळांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीचीArmstrong Company पाहणी करून त्यांनी बेहिशेबी मालमत्तेच्या मुद्द्यावरून भुजबळांवर आरोपांचा जोरदार भडिमार केला असून मुंबईतMumbai सांताक्रुझला Santa Cruzभुजबळांची 9 मजली इमारत आहे. या इमारतीत पुर्ण भुजबळ कुटुंब राहतं. या बिल्डिंगशी त्यांचा संबंध काय? ही इमारत परवेज कन्स्ट्रक्शनच्या Pervez Construction नावाने आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय? या इमारतीचं भाडं तुम्ही भरता की ही इमारतच तुम्ही विकत घेतली आहे? ही इमारत बांधण्यासाठीचा पैसा कुठून आला? असे सवाल करतानाच परवेज कन्स्ट्रक्शन ही बोगस कंपनी असून या कंपन्या चालवणारे लोक बनावट आहेत, असा आरोपही सोमय्यांनी केला आहे.

किरीट सोमय्यांनी, बेहिशेबी मालमत्तेच्या संदर्भात छगन भुजबळांवर केले मोठे आरोप! (पहा व्हिडिओ)
तुम्ही लवकर बऱ्या व्हा, बाकीच आम्ही बघतो; राज ठाकरेंचा कल्पिता पिंपळेना शब्द

भुजबळांवर यापूर्वीही सोमय्या यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत आता भुजबळांशी संबंधित 120 कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. भुजबळांच्या अनेक बोगस कंपन्या असून या कंपन्यांमध्ये आलेला पैसा कुठून येतो असा सवालही सोमय्यांनी उपस्थित केलाय. शिवाय उद्धव ठाकरेंनीUddhav Thackeray भुजबळांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेनाShivsena असा संघर्ष सुरुय. परिवहन मंत्री अनिल परबAnil Parab यांना ईडीची नोटीसED Notice दिल्यानंतर खासदार भावना गवळीBhavna Gavali यांच्याशी संबंधित संस्थांवरदेखील ईडीने छापे टाकले आहेत. त्यापाठोपाठ सोमय्यांनी पुन्हा एकदा भुजबळांना टार्गेट केलं असून जितेंद्र आव्हाडही Jitendra Avhad लिस्टमध्ये असल्याचं सांगत त्यांनी खळबळ उडवून दिलीय. त्यामुळे येत्या काळात भुजबळ विरुद्ध सोमय्या हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com