Mumbai Best Bus Accident Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Best Bus Accident : मुंबईत पुन्हा बेस्ट बसचा भीषण अपघात, ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Mumbai best bus accident update : मुंबईत पुन्हा एकदा बेस्ट बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईच्या लालबागमध्ये काही दिवसांपूर्वी बेस्ट बसचा अपघात झाला. या बेस्ट बसच्या अपघात एका २८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मद्यधुंद प्रवाशामुळे हा भीषण अपघात झाला. त्यानंतर मुंबईत पुन्हा एकदा बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. मुंबईच्या आरे कॉलनीत बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. आरे कॉलनीत झालेल्या बेस्ट बसच्या भीषण अपघातानंतर परिसरात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, लालबागनंतर आता गोरेगावमध्ये बेस्ट बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. गोरेगाव पूर्वकडील आरे कॉलनी परिसरात वेगाने जाणाऱ्या बेस्ट बसच्या धडकेत ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात ४७ वर्षीय सादिक साजिद खान असं अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सादिक साजिद खान यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

आज मंगळवारी दुपारी युनिट क्रमांक पाचमधून रॉयल पामच्या दिशेने जाणाऱ्या युनि क्रमांक या भागात ही भीषण अपघाताची घटना घडली. बेस्ट बस चालक रमेश लोंढे हे बस घेऊन जात असताना समोरून आलेल्या दुचाकी वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला बसचे कंडक्टर आणि नागरिकांनी रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी या व्यक्तीला मृत घोषित केले. आरे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी बस चालक रमेश लोंढे याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लालबागमध्ये बेस्ट बस अपघातात तरुणीचा मृत्यू

मुंबईतील लालबाग या ठिकाणी बेस्ट बसचा अपघात झाला. या अपघातातील आरोपी दत्ता शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. बलार्ड पिअर या ठिकाणाहून सायनच्या दिशेने बस निघाली होती. लालबागमध्ये दत्ता शिंदे आणि बेस्ट बस चालकामध्ये हुज्जत झाली. भांडणादरम्यान दत्ता शिंदेने बेस्ट बस चालकाचं स्टेअरिंग खेचलं. त्यानंतर बसवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात ८ जण जखमी झाले. तर नुपूर मणियार मुलीचा मृत्यू झाला. तर आरोपी दत्ता शिंदेच्या मुसळ्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT