53km Elevated Road : पुण्यात तयार होतोय ५३ किमीचा फ्लायओव्हर, थेट समृद्धी महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणेकर नागपूरला झटक्यात पोहचणार!

Samruddhi Mahamarg : पुण्यातील लोणीकंदजवळील केसनंद ते शिरूर पर्यंत देशातील सर्वात लांब ५३ किमी फ्लायओव्हर उभारण्यात येणार नाही. ६ लेनच्या या मार्गामुळे मुंबईकरांनाही समृद्धी महामार्गावर लवकर पोहोचता येणार आहे.
53km Elevated Road : पुण्यात तयार होतोय ५३ किमीचा फ्लायओव्हर, थेट समृद्धी महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणेकर नागपूरला झटक्यात पोहचणार!
Published On

मुंबईकरांना लवकरच पुण्याकडे जाण्यासाठी समृद्धी महामार्गाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारने पुण्याहून शिरूरपर्यंत ५३ किमी लांबीचा सहा पदरी एलिवेटेड मार्ग म्हणजेच फ्लायओव्हर प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा मार्ग देशातील सर्वांत लांब फ्लायओव्हर मार्ग असणार आहे. या रस्त्यामुळे प्रवाशांना अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगरमार्गे ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गावर प्रवास करता येणार आहे. शिरूर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यानच्या महामार्गाचं रुंदीकरण आणि विकास केला जाणार आहे.

नुकताच मंत्रिमंडळाची बैठकीक पार पडली. या बैठकीत समृद्धी महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगरपर्यंत जोडण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. पुणे ते छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय राज्यमार्गाचं काम एनएचएआय कडून केलं जातं होतं. मात्र आता एमएसआयडीसीकडे हे काम वर्ग करण्यात आलं आहे. यासाठी एप्रिल महिन्यात ‘एमएसआयडीसी’ सोबत करार झाला होता. या मार्गामुळे केवळ पुणे ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान चांगला संपर्क होणार नाही तर या भागातील आर्थिक आणि सामाजिक विकासही होणार आहे, असा सरकारला विश्वास आहे.

कसा असेल ५३ किमी फ्लायओव्हर?

पुण्यातील लोणीकंदजवळील केसनंद ते शिरूर असा हा प्रकल्प असणार आहे. यामुळे समृद्धी महामार्गावर अधिक वेगाने पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे पुण्यासह मुंबईही नागपूरला जोडली जाणार आहे आणि या मार्गावरील प्रवास अधिक सोपा होणार आहे. तसंच या मार्गामुळे पर्यटनाला चालणा मिळणार आहे. तसंच व्यापारासाठी महत्त्वाच्या ठिकाणीही लवकर पोहोचता येणार आहे.

53km Elevated Road : पुण्यात तयार होतोय ५३ किमीचा फ्लायओव्हर, थेट समृद्धी महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणेकर नागपूरला झटक्यात पोहचणार!
Pune Vande Bharat Express: ३ तासांचा प्रवास फक्त ५५ मिनिटांत होणार; पुण्यातूनही सुरू होणार वंदे भारत एक्सप्रेस

किती असेल खर्च?

राज्य सरकारने या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली असून, रु. ७,५१५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. शिरूर ते अहमदनगरपर्यंतचा बायपास रस्ता सुधारण्यासाठी आणखी रु. २,०५० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे कोकण, विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडील भागातील प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. प्रकल्पाचं काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (MSIDC) राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने पूर्ण करणार आहे.

पीडब्ल्यूडी आणि महाराष्ट्र सरकार दोन वर्षांत हा प्रकल्प सुरू करणार आहे. ठरलेल्या मुदतीत प्रकल्प पूर्ण झाला नाही तर यांच काम एमओआरटीएचकडे जाणार आहे. समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या पहिला टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं. त्यानंतर दुसरा टप्पा शिर्डी ते इगतपुरी तालुक्यातील भर्वीरपर्यंत सुरु झाला होता. तर मुंबई नागपूर एक्स्प्रेस वेचा तिसरा आणि अंतिम टप्पा २०२४ च्या अखेरपर्यंत पूर्णपणे खुला करण्यात येणार आहे.

53km Elevated Road : पुण्यात तयार होतोय ५३ किमीचा फ्लायओव्हर, थेट समृद्धी महामार्गाला जोडणार, मुंबई-पुणेकर नागपूरला झटक्यात पोहचणार!
Special Story: स्वातंत्र्यानंतरही रुग्णांच्या वाट्याला 'डोली'; काळ बदलला सरकारं बदलली तरीही व्यवस्थेचे तीन तेरा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com