Pune: धक्कादायक ! 76 वर्षीय आईचा खून करत 42 वर्षीय मुलाची आत्महत्या
Pune: धक्कादायक ! 76 वर्षीय आईचा खून करत 42 वर्षीय मुलाची आत्महत्या  Saam TV
मुंबई/पुणे

Pune: धक्कादायक ! 76 वर्षीय आईचा खून करत 42 वर्षीय मुलाची आत्महत्या

अमोल कविटकर, पुणे

पुणे : पुण्याच्या सहकार नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या ७६ वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तिचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यांनी हा खून केला तो पोटचा मुलगा होता. आईचा खून केल्यानंतर त्याने स्वत: गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. गणेश मनोहर फरताडे आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे अशी या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश याची मावस बहिण यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Pune Sahkarnagar Murder Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे आणि आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. गणेशला काही कामधंदा नव्हता. तसेच त्याच्यावर कर्जही झाले होते. बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे तो त्रासला होता. या कारणावरुन त्याने आईला औषधाचा ओव्हर डोस दिला, ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून तिचा खून केला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. तेथील लोखंडी हुकाला नायलॉनची दोरी बांधून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पोलीस निरीक्षक मुलाणी अधिक तपास करीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घरात मनी प्लांट लावताना या चुका टाळा; अन्यथा प्रगती थांबेल

Today's Marathi News Live: ४ जूननंतर अच्छे दिनाची सुरुवात होईल - उद्धव ठाकरे

Khadakwasla Dam Water Level: पुणेकरांना दिलासा, पाणीकपातीचे संकट टळलं; जाणून घ्या खडकवासला धरण साखळी पाणीसाठ्याची स्थिती

Chardham Yatra Bus Accident | बुलढाण्यातून चारधाम यात्रेसाठी गेलेल्या भाविकांच्या बसला भीषण आग

Soami Bagh Mausoleum : सेम टू सेम ताजमहालच! बांधकामाला १०० हून अधिक वर्षांचा काळ; पर्यटकांचं ठरतंय आकर्षण

SCROLL FOR NEXT