मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आ ज पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा एनसीबीवरती गंभीर आरोप केले. 2021 मध्ये आम्ही एनसीबीचा फर्जीवाडा समोर आणला, अधिकाऱ्यांनी बोगस तक्रारी दाखल केल्या. पंचनामे बॅक डेटेड करण्यासाठी पंचांना धमकावले जात आहे. समीर वानखेडे यांना ज्यांना धमकावले जात आहे त्यांनी फोन केले. घाबरू नका जाऊन या असे वानखेडे यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी त्या संबंधीच्या दोन ऑडिओ क्लिप देखील ऐकवल्या. या क्लिपमध्ये पंचनामे बॅक डेटेट करण्यासाठी धमकावले जात आहे. NCB अधिकाऱ्यांचा फर्जीवाडा थांबलेला नाही अशी टीका नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली.
बॅक डेटेड पंचनाम्यावर सही करण्यासाठी धमकी...
मॅडी नावाच्या पंचाला बाबू नावाचा अधिकारी ऑफिस मध्ये न येता बाहेरच पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यासाठी बोलत आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्याशी झालेल्या बोलण्याची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे. समीर वानखडे (Sameer Wankhede) हे पंचनामा करण्यासाठी या घाबरू नका असे सांगत असल्याचे नवाब मलिक म्हणाले. NCB च्या सर्व अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे का? SIT स्थापन केली होती त्याचं काय झालं? कोर्टात जाऊन मला बोलण्यास मनाई करण्यात आली. NCB केंद्रीय यंत्रणा चुकीचे करेल तर मला बोलण्याचा अधिकार आहे हे मी कोर्टाला सांगितले होते असे नवाब मलिक म्हणाले. त्याचबरोबर PR एजन्सी वर लाखो रुपये देत बातम्या तयार केल्या जात असल्याची टीकाही नवाब मलिक यांनी केली.
मला घाबरविण्याचा प्रयत्न...
मला घाबरविण्याचा प्रयत्न केला जात आहे. करण सजलानी मुख्य आरोपी असतांना तक्रार दाखल केली नाही. समीर खान यांच्यावर तक्रार दाखल करत अडकवले जात आहे. NCB फर्जीवाड्याची मर्यादा पार करत आहे. याला नवाब मलिका घाबरणार नसल्याचे ते म्हणाले. दिल्लीत समीर वानखेडे आणि लॉबिंग करत आहेत. समीर वानखडे यांना एक्सटेन्शन मिळावे यासाठी भाजपचा मोठा नेता प्रयत्न करत आहे. समीर वानखेडे फर्जीवाड्यात सहभागी असल्याची गंभीर टीका मलिक यांनी केली. पंचनामे बदलण्यासाठी कोण प्रयत्न करत होता. मी ऑडिओ आणि कागदपत्र NCB ला देणार आहे. NCB ने मला माहिती द्यावी. भाजपचा कोण नेता भ्रष्ट अधिकाऱ्याला वाचवत आहे हे RTI मधून बाहेर काढणार असल्याचे मलिक म्हणाले.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.