Prithviraj Chavan Saam Tv
मुंबई/पुणे

Prithviraj Chavan: 'हिंजवडीत येणाऱ्या 37 कंपन्या गुजरात आणि आसाममध्ये गेल्या', पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप

Prithviraj Chavan On Maharashtra Government : हिंजवडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

Satish Kengar

हिंजवडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या बाहेरच्या राज्यांत गेल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत असल्याने या कंपन्या स्थलांतरीत होणार आहे. सेमी कंडक्टरचे चार युनिट राज्यामध्ये येणार होते. मात्र, त्यामधील 3 युनिट गुजरातला गेले आहेत आणि एक आसाममध्ये गेला असल्याचे चव्हाण यांनी म्हटलं आहे. पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. बेरोजगार युवकांनी ‌हे लक्षात‌ घ्यावं. राज्यातले उद्योग बाहेर जात आहेत. त्याला उद्योग खात्यातला भ्रष्टाचार बोकाळला आहे. त्यामुळं उद्योग राज्य सोडून जात आहेत.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, काल केंद्र सरकारनं कांदा आणि बासमतीवरचा किमान निर्यात शुल्क काढून टाकलं आहे. कांद्यावर निर्यात शुल्क 40 टक्केवरुन 20 टक्क्यांवर आणलं आहे. याचा काही फायदा होऊ शकतो. पण लोकसभा निवडणुकीत या सरकारनं निर्यातबंदी करुन शेतकऱ्यांचा घात केला.''

ते म्हणाले, ''सरकारला माझा सवाल आहे, देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात 37 टक्के शेतकरी आत्महत्या करत आहे. आता पराभव दिसत असताना हे निर्णय घेतले आहेत. हरियाणात‌ तांदूळ पिकतो, कांदा महाराष्ट्रात आहे. त्यामुळं राजकीय निर्णय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतले जात आहेत. 2013 मध्ये सोयाबिनला 6000 भाव द्या, अशी मागणी फडणवीस करत होते. आता 4500 भाव मिळतोय, आता तोंड कुठे लपवून बसेल आहात.''

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाला आहे. याबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण की, ''त्यांनी विधानसभेत भाषण केले होते. मोदी आणि अदानी यांच्या संदर्भात त्यांनी हे भाषण केले होते. त्यांचे दिल्लीमध्ये बहुमत आहे. त्यामध्ये उपस्थित केलेल्या मुद्द्यावर मोदी बोलू शकले नाहीत. त्यांना आता सुप्रीम कोर्टाने जामीन दिला आहे. नरेंद्र मोदी स्वतःचा बचाव करत आहेत. हरियाणा आणि दिल्लीत याचे परिणाम दिसेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT