Kalyan crime news  saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं, १५ दिवसांपूर्वी आली होती बहिणीकडे

Kalyan crime news : 28 वर्षीय तरुणीने बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. कल्याणमधील या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे.

Vishal Gangurde

28 वर्षीय तरुणीने कल्याण पूर्वेतील मेट्रो रेसिडेन्सीमध्ये आत्महत्या केली.

इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवलं

कोळसेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण घडला

या घटनेने कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय

कल्याणमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणच्या पूर्वेतील मेट्रो रेसिडेन्सी या इमारतीतील खळबळजनक प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या इमारतीत २८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याचे समोर आलं आली आहे. आजाराने त्रस्त झालेल्या तरुणीने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचललं.

कल्याणी झा असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तिने आज शुक्रवारी इमारतीच्या टेरेसवरुन खाली उडी मारून आयुष्य संपवलं. कल्याण कोळसेवाडी परिसरात हा संपूर्ण प्रकार घडला. इमारतीवरून उडी मारल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणी झा गेल्या काही काळापासून आजारानं त्रस्त होती. ती 15 दिवसांपूर्वी उपचारासाठी दिल्लीहून बहिणीकडे कल्याण येथे आली होती. आज शुक्रवारी अचानक तिने इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. कल्याण पोलिसांकडून आता आत्महत्येचे नेमके कारण शोधले जात आहे.

तरुणीच्या आत्महत्येनेतर स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांकडून या प्रकरणात पोलिसांना सहकार्य केलं जात आहे. या प्रकरणात इमारतीच्या सुरक्षा कर्मचार्‍यांची देखील विचारपूस केली जात आहे. या प्रकरणामुळे मानसिक आरोग्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT