Mumbai Local Train
Mumbai Local Train saam tv
मुंबई/पुणे

Vande Metro Local For Mumbaikar: मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, मुंबईत लवकरच 238 'वंदे मेट्रो लोकल' धावणार; जाणून घ्या काय सुविधा मिळणार

Priya More

Mumbai Local News: मुंबई लोकलला (Mumbai Local) मुंबईकरांची (Mumbaikar) लाईफ लाईन म्हणून ओळखले जाते. या लोकलमुळे मुंबईकरांचा प्रवास अतिशय स्वस्तात आणि जलद गतीने होतो. आता लवकरच मुंबईची लोकल सेवा हायटेक होणार आहे. विदेशाचा धर्तीवर हायटेक वंदे मेट्रो लोकल लवकरच मुंबईत धावणार आहे. वंदे मेट्रो लोकलमुळे (Vande Metro Local) मुंबईकरांना प्रवास गारेगार त्यासोबतच वेगवान होणार आहे. या लोकलच्या माध्यमातून मुंबईकरांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहे.

रेल्वे बोर्डाने शुक्रवारी रेल्वे विकास महामंडळाच्या एमयुटीपी प्रकल्पांतर्गत 238 वंदे मेट्रो लोकल बांधणीला मजुरी दिली. वंदे मेट्रो लोकल बांधण्यासाठी जवळपास 20 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेड इन इंडियाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या वंदे भारत ट्रेनपाठोपाठ रेल्वे बोर्डाने वंदे मेट्रो लोकलची बांधणी सुरू केली आहे. या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत वंदे मेट्रो लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी 1 फेब्रुवारी 2023 रोजी शहरांतर्गत प्रवासासाठी वंदे मेट्रो संकल्पना जाहीर केली होती. आता रेल्वे बोर्डाने शुक्रवारी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी प्रकल्पांतर्गत 238 वंदे मेट्रो (उपनगरी) बांधणीला रेल्वे मंडळाने मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र रेल्वे मंडळाने मुंबई रेल्वे विकास महामंडळाला शुक्रवारी पाठवले. या वंदे मेट्रोला उपनगरी लोकल सेवा म्हणून चालवण्यात येणार आहेत.

वातानुकूलित वंदे मेट्रो लोकलचा देखभालीसाठी मुंबई महानगर प्रदेशात दोन नवीन कारशेड उभारण्यात येणार असून यासाठी जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे. दरम्यान या लोकलच्या देखभालीसाठी वाणगाव आणि भिवपुरी येथे कारशेड उभारण्यात येणार आहेत. यासाठी जागेची निश्चिती करण्यात आलेली आहे, अशी माहिती एमआरव्हीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मेक इन इंडिया मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे तंत्रज्ञान भागीदाराद्वारे वातानुकूलित वंदे मेट्रो लोकलची बांधणी करण्यात येणार आहेत.

मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई शहरी परिवहन प्रकल्पात मुंबईकरांच्या आरामदायी प्रवासासाठी एकूण 238 वातानुकूलित लोकल बांधण्याचे प्रस्तावित आहे. यात एमयूटीपी-3 मधील 47 आणि एमयूटीपी-3 अ मधील 191 वातानुकूलित लोकलचा समावेश आहे. आता या सर्व लोकल वंदे मेट्रो असणार आहेत. वंदे भारत लोकलसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे.

महत्वाचे म्हणजे, वंदे मेट्रो लोकल ही वंदे भारत ट्रेनची एक छोटी आवृत्ती आहे. जी कमी अंतर असलेल्या दोन शहरांदरम्यान चालवली जाणार आहे. केंद्र सरकारने 2022-23 च्या अर्थसंकल्पात या ट्रेनची घोषणा करण्यात आली होती. या ट्रेनद्वारे 100 किमीपेक्षा कमी अंतराची दोन शहरे जोडली जाणार आहेत. मोठी लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांमध्ये वंदे मेट्रो 50 ते 60 किलोमीटर दरम्यान चालवली जाणार असल्याची योजना आहे.

वंदे मेट्रो लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे असणार आहे. ही संपूर्ण लोकल वातानुकूलित असणार आहे. प्रथम किंवा द्वितीय श्रेणी या लोकलमध्ये नसणार आहे. महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबे असणार आहेत. प्रत्येक डब्यांमध्ये एलईडी दिवे असणार आहेत. या लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि पॅसेंजर टॉक बँक प्रणाली असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Din 2024 : जय जय महाराष्ट्र माझा... १ मे ला महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?

Jalana News: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग! गावकरी, पोलीस घटनास्थळी दाखल; जालन्यात काय घडलं?

Samruddhi Kelkar: तुझ ते लाजण अन् लाजून नाजूक हसणं...

Narendra Modi: कलम ३७० पुन्हा लागू करण्याची कुणामध्येही हिंमत नाही; पंतप्रधान मोदी कडाडले

Bomb Threat Mailed To Nagpur Airport: नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवणार, धमकीचा मेल; पोलिसांकडून मॉक ड्रिल

SCROLL FOR NEXT