Manohar Joshi Health Update: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या प्रकृतीबाबत हिंदुजा रुग्णालयातून आली महत्वाची अपडेट

Manohar Joshi Health Update: हिंदुजा रुग्णालयाकडून मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे
Manohar Joshi
Manohar JoshiSaam Tv

भूषण शिंदे

Manohar Joshi News: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. कालपासून मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. याचदरम्यान, हिंदुजा रुग्णालयाकडून मनोहर जोशी यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. (Latest Marathi News)

पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईच्या वतीने मीडिया स्टेटमेंट जारी करण्यात आले. मीडिया स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आले आहे की, 'माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना २२ मे रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. ते अर्ध कोमात (semi coma) आहेत'.

Manohar Joshi
Maharashtra Political News: ठरलं! सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी काँग्रेसने आखली नवी रणनीती; बैठकीत केले विविध ठराव पास

'ते अद्याप कृत्रिम शवासोच्छ्वास तंत्रावर नाहीत. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून मात्र अधिक उपचारांची आवश्यकता आहे, असं मेडिकल स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

Manohar Joshi
Ashish Shelar News: आशिष शेलारांवर काँग्रेसचे गंभीर आरोप, गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे असून त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1937 रोजी रायगड जिल्ह्यातल्या नांदवी गावात झाला. शिक्षणानिमित्त मनोहर जोशी हे मुंबईत स्थलांतरीत झाले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबई महानगरपालिकेत अधिकारी म्हणूनही नोकरी केली.

शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मुंबईचे महापौरपदही त्यांनी 1976 ते 1977 या काळात भूषवलं होतं. तर शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com