Children Vaccination Saam Tv
मुंबई/पुणे

Children Vaccination: २०० लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण होणार सुरू

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - कोरोना (Corona) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ३ जानेवारी पासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला केंद्र सरकारने (Central Government) परवानगी दिली. मुंबईत देखील ९ केंद्रांवर हे लसीकरण सुरू आहे. तेव्हापासून आतापर्यंत ५८ हजार ६७८ मुलांनी लसीचा (Vaccination) पहिला डोस घेतला आहे. (200 children vaccination centers will start)

मुंबईत (Mumbai) ९ लाख २२ हजार ५१६ मुलांचं या टप्प्यात लसीकरण होणार आहे. तर २८ दिवसांनी दुसरा डोस दिला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यातच पहिला डोस सगळ्या मुलांना देण्याचं पालिकेचं नियोजन आहे. तर फेब्रुवारी महिन्यात दुसरा डोस देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

हे देखील पहा -

लसीकरणासाठी पालिकेने नियोजन आखल असून आता येत्या सोमवार पासून ९ च्या ऐवजी २०० लसीकरण केंद्रांवर १५ ते १८ वयोगटातील मुलांचं लसीकरण होणार आहे . लसीकरणाला वेग देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या असलेल्या लसीकरण केंद्रांवर (Vaccination Centre) जिथे कॉव्हक्सिन लस उपलब्ध असेल अश्या लसीकरण केंद्रांवर लस दिली जाणार आहे .

त्याच बरोबर आगामी काळात महाविद्यालयाशी संगतन्मताने लसीकरणाचे कॅम्प महाविद्यालयाच्या आवारात भरवले जाणार आहेत. त्याच बरोबर पालिकेच्या शाळांमध्ये (School) देखील लसीकरण कॅम्प लावले जाणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळवर दाखल

Ramayana Movie : 31 वर्षांनंतर पुन्हा येणार 'रामायण' थिएटरमध्ये, 'या' चार भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Rashmika Mandanna: श्रीवल्लीचा स्टनिंग लूक; ब्लॅक आऊटफिटमध्ये केला कहर

5 Laws for Woman : प्रत्येक महिलेला 'हे' ५ कायदे माहीत असलेच पाहिजेत

Maharashtra Politics : काँग्रेसचा १२५ जागांवर दावा, कुठे किती जागा मागितल्या?

SCROLL FOR NEXT