BMC: प्रकल्प बधितांसाठी आता वरळीत घरे; १७५ कोटी खर्चून ४५० घरे बांधण्याचा निर्णय

वरळीतील (Varali) गणपतराव कदम मार्गावरील गोमाता नगर परिसरात या आधी संक्रमण शिबीर उभारण्यात आले होते, हे संक्रमण शिबिर धोकादायक ठरल्यामुळे याच ठिकाणी नवी घरे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.
BMC
BMCSaam Tv
Published On

मुंबई - महानगर पालिकेकडून अनेक प्रकल्प उभारले जातात. हे विकास कामं सुरू असताना या प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या रहिवश्यना इतरत्र ठिकाणी घरं (Home) देणं आवश्यक असतं. पण ही घरे बऱ्याचदा शहरापासून दूर एक बाजूला असल्याने रहिवासी आपली जागा सोडू जाण्यास तयार होत नाहीत. परिणामी प्रकल्पांचा खर्च वाढत राहतो. प्रकल्पग्रस्तांनी तात्काळ घराचा ताबा सोडून स्थलांतरण करावं यासाठी शहरातील मोक्याच्या ठिकाणी घरे बांधण्याचे मुंबई महापालिकेने (Municipal Corporation) प्रयत्न सुरु केले आहेत. (houses in varali for project victims)

वरळीतील (Varali) गणपतराव कदम मार्गावरील गोमाता नगर परिसरात या आधी संक्रमण शिबीर उभारण्यात आले होते, हे संक्रमण शिबिर धोकादायक ठरल्यामुळे याच ठिकाणी नवी घरे बांधण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या घरांच्या जागेवर १७५ कोटी खर्चून ३०० चौ. फुटाची ४५० घरे उभारली जाणार आहेत. त्यासाठीच्या निविदा पालिकेने मागविल्या आहेत. ही घरे जलदगतीने बांधायची असल्याने 'अल्ट्रा हाय परफाॅर्मन्स काँक्रीट'चा वापर करण्यात येणार आहे. हे काँक्रीट उच्च दर्जाचं असून परवानगी मिळाल्यास १५ दिवसात कार्यादेश दिल जाणार आहेत.

हे देखील पहा -

महानगर पालिका प्रकल्पांमध्ये बाधित कुटुंबांची संख्या ३६ हजार २२१ इतकी आहे. पैकी आता पर्यंत प्रकल्पग्रस्तांना २४ हजार ४९६ घरे महानगर पालिकेने वितरीत केली आहेत. तर चेंबूर परीसरात पालिकेला मालमत्तांच्या दुरुस्तीनंतर ८१९ घरे आणि इतर ठिकाणी १३१ घरे उपलब्ध होणार आहेत. तर इतर घरांच्या निर्मितीसाठी पालिका जागा शोधत असून जागा मालकांकडून पालिका अर्ज मागवतेय. यातील काही घरं दहिसर आणि चांदीवलित देखील उभारली जाणार आहेत .

BMC
Tukaram Supe: TET पेपर गैरव्यवहारातील आरोपी तुकाराम सुपे कोरोनाबाधित

त्याच बरोबर माहुल येथील एव्हरस्माईल लेआऊटमधील ३ हजार ८२८ घरे मिळणार आहेत . मात्र माहुलमधील प्रदूषणामुळे नागरिक तेथे राहण्यास तयार नसल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार या घरांचे वाटप करता येत नाही.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com