Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: 'मोस्ट वॉन्टेड’ दहशतवाद्यांना पकडणारे पुणे पाेलिसांचे खरे हिराे

पुण्याच्या कोथरूड भागातून दोन "मोस्ट वॉन्टेड" दहशतवादी पकडले असून, या दोघांवर एनआयएकडून ५ लाखांचे बक्षीस जाहीर होते.

Shivani Tichkule

अक्षय बडवे

Pune Crime News: पुण्याच्या कोथरूड भागातून दोन "मोस्ट वॉन्टेड" दहशतवादी पकडले असून, या दोघांवर एनआयएकडून ५ लाखांचे बक्षीस जाहीर होते. गेल्या दीड वर्षांपासून ते फरार होते. या दोघांना पकडण्यात आलेले खरे हिरो ठरले ते कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन. (Latest Marathi News)

पुणे शहरात कोयता गॅंग आणि गाडी तोडफोडच्या घटना ताज्या असल्याने झालं असं की मंगळवारी पहाटे कोथरूड पोलिसांचे कर्मचारी गस्त घालत असताना कोथरुडच्या बधाई चौकात मोटर सायकल चोरी करताना ३ तरुण दिसून आले.

यावेळी ड्युटीवर असलेल्या कोथरूड पोलीस (Police) ठाण्याचे कर्मचारी प्रदीप चव्हाण आणि अमोल शरद नझन यांनी त्या ३ जणांना पकडले मात्र यावेळी एकाने तिथून पळ काढला. मात्र चव्हाण आणि नझन यांनी त्या दोघांना पकडुन ठेवले आणि त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले.

मोहमद युनूस साकी व इम्रान खान असे या २ व्यक्तींचे नाव आहे. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते उडवा उडवी चे उत्तरं देऊ लागले. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी खरे सांगितले. हे दोघे ही जण राजस्थानात मोस्ट वॉन्टेड आहेत.

पुणे पोलिसांकडून आता एनआयए तसेच इतर तपास यंत्रणांना याबद्दलची माहिती देण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे. पुणे (Pune) पोलिसांकडून पकडण्यात आलेले हे दोन दहशतवादी इसिसच्या सुफा संघटनेचे सदस्य असल्याचा संशय आहे.

मार्च २०२२ मध्ये राजस्थानच्या छितोडगड मध्ये पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले होते आणि त्यांच्याकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले होते. तिघांकडून बॉम्ब बनवण्यासाठी लागणारी पावडर व अन्य साहित्य जप्त करण्यात आले होते.

हे प्रकरण नंतर एनआयएकडे पुढील तपासासाठी देण्यात आले आणि तपासा दरम्यान युनूस साकी आणि इम्रान खान या दोघांचे नाव समोर आले.हे दोघेही आरोपी एनआयएच्या याच प्रकरणात वॉन्टेड आरोपी होते. या दोघांवर प्रत्येकी ५ लाखाचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं होतं.मागील काही महिन्यापासून ते पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.

दुसऱ्या बाजूला, कोथरूड पोलिस ठाण्याचे कर्मचारी चव्हाण आणि नझन यांनी मोठी कामगिरी करत दोघांना ताब्यात घेतले असून या दोघांचे ही वरिष्ठ पोलीस दलाकडून कौतुक होत आहे.मात्र हे दहशतवादी पुण्यात कशासाठी आले होते त्याचा काय मनसुबा होता याचा तिसरा साथीदार कुठे फरार झाला आता याचा सर्व तपास या तपास यंत्रणांना करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घराला कोण करणार टाटा,बाय-बाय? सलमान खानने दिला मोठा धक्का

Serious illness signs: लघवीमधून लाल रंग दिसत असेल तर सावध व्हा; 'या' गंभीर आजाराचे संकेत असू शकतात

Shocking: बायकोचं शिर धडावेगळं केलं, नंतर शरिराचे १७ तुकडे करत...; आयुष्यभर साथ देण्याचं वचन देणाऱ्या नवऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात होणार पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री? स्पर्धकाचे नाव वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT