Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात १४ वर्षीय बालकाचा क्रिकेट खेळताना मृत्यू; हडपसर भागातील दुर्दैवी घटना

Heart Attack: आपल्या पोटचा गोळा गेल्याचं समजताच वेदांच्या आई वडिलांनाच्या पायखालची जमीनच सरकली..

Shivani Tichkule

Pune Heart Attack News: गेल्या काही महिन्यांपासून देशात हृदयविकाराच्या झटक्याने अनेकाचे मृत्यू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यासंदर्भातील अनेक धडकी भरवणारे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये कुणाचा नाचताना, कुणाचा दांडिया खेळताना, तर कुणाला भर मंडपात हार्ट अटॅक आल्याच्या घटना घडल्या आहेत. तरुणांपासून ते वृद्धापर्यंत कुणालाही हार्ट अटॅक येताना दिसत आहे. (Latest Marathi News)

आता अशीच काहीशी घटना पुण्यातील (Pune) हडपसर भागात घडली आहे. १४ वर्षीय तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली.वेदांत धामणगावकर असे या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे वेदांत हा त्याच्या मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. त्यावेळी अचानक त्याला छातीत दुखू लागल्यामुळे त्याने त्याच्या वडिलांना कळवले. वडिलांनी तात्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. (Pune News)

मात्र त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयामध्ये जाण्यास सांगितले. दुसऱ्या रुग्णालयात पोहोचताच त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरांनी (Doctor) वेदांतचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने वेदांचा मृत्यू झाला असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आठवीत शिकत होता. शाळेला सुट्टी लागल्यामुळे तो मित्रांसोबत क्रिकेट खेळायला गेला होता. खेळत असताना वेदांतने वडिलांना फोन करून छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी त्याला तत्काळ जवळच्या दवाखान्यात दाखल केले.

मात्र, डॉक्टरांनी मोठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे सांगितले. त्यामुळे वेदांतला फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या वेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अवघ्या १४ वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने वानवडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT