akola,
akola, saam tv

Akola News : वान धरणाच्या पाण्यावरून अकोल्यातील राजकारण तापले; शिवसेना विरुद्ध प्रहारचे पाण्यासाठी आंदोलन

प्रहारने वारी हनुमान येथील वान धरणा समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Published on

Akola News : अकोल्यातील वान धरणावरून (akola wan dam) खारपान पट्ट्यातील 69 गावे पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती कायम ठेवावी याप्रमुख मागणीसाठी अकोल्यातील वान धरण परिसरात शेतकऱ्यांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्नावरुन पुन्हा एकदा रान पेटलं आहे. (Maharashtra News)

akola,
Parbhani News : रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी आज Line Block; चार रेल्वे गाड्या उशिराने धावणार

अकोला जिल्ह्यात सध्या वान धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले असून बाळापूर मतदारसंघातील खारपान पट्ट्यातील 69 गावांसाठी पिण्यासाठी या धरणातून पाणी देण्यात यावे आणि योजनेवर लावण्यात आलेली स्थगिती उठवण्यात यावी यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे आंदोलन करत आहेत.

akola,
Aakshaya Tritiya च्या मुहूर्तावर साई भक्तांसह शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; शिर्डीत संस्थानने घेतला माेठा निर्णय

तर तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा समजला जाणाऱ्या व जीवनमानाचा प्रश्न असलेल्या व मूळ सिंचन उद्देश ठेवून बनविण्यात आलेल्या वानधरणावरून अकोला अमृत व बाळापूर 69 खेडी पाणीपुरवठा योजना रद्द करण्यासाठी लोकजागर मंच आणि प्रहारचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी शेकडो शेतकऱ्यांसह विविध मागण्यांकरिता वारी हनुमान येथील वान धरणा समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

akola,
Naygoan Bajar Samiti Election News : नायगाव कृषी उत्पन्न बाजार समिती बिनविराेध; भाजप, काँग्रेसच्या दिलजमाईची चर्चा

शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न एरणीवर आला असून या योजनेमुळे सिंचनाचा अनुशेष वाढणार आहे असे अनिल गावंडे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे आता कुणाच्या मागणीला यश येते हे येणाऱ्या काळात पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com