Aakshaya Tritiya च्या मुहूर्तावर साई भक्तांसह शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; शिर्डीत संस्थानने घेतला माेठा निर्णय

न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
Shirdi Sai Mandir, Aakshaya Tritiya
Shirdi Sai Mandir, Aakshaya TritiyaSaam Tv
Published On

- सचिन बनसाेडे

Shirdi Sai Baba Mandir News : शिर्डी येथील साईमंदिरात दोन वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फुल, प्रसादावरील बंदी लवकरच हटवली जाणार आहे. साई संस्थानच्या तदर्थ समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी साई संस्थानकडून दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे. ही बंदी उठल्यानंतर परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Breaking Marathi News)

Shirdi Sai Mandir, Aakshaya Tritiya
APMC Market Vashi : हापूस आंबा खरेदीसाठी वाशी एपीएमसीत नागरिकांची झुंबड; जाणून घ्या दर

काेराेनामुळे दोन वर्षांपासून साई मंदिरात हार, फुल, प्रसाद घेऊन जाण्यास घातलेली बंदी अद्यापही कायम आहे. खाजगी दुकानदारांकडून हार, फुल, प्रसाद विक्रीतून भाविकांची लूट होत असल्याचा वारंवार आरोप होत असल्याने ही बंदी कायम ठेवण्यात आली. मात्र काही अपप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात ३८४ हेक्टर क्षेत्रावर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

Shirdi Sai Mandir, Aakshaya Tritiya
Parbhani News : रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी आज Line Block; चार रेल्वे गाड्या उशिराने धावणार

ही बंदी उठवावी या मागणीसाठी आठ महिन्यांपूर्वी साई मंदिराच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आणि व्यावसायिक यांनी आंदोलन केले होते. महसूलमंत्री तथा शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती.

Shirdi Sai Mandir, Aakshaya Tritiya
Yavatmal Reliance च्या Smart Superstore मध्ये सडक्या अन्नधान्याची विक्री, अन्न व औषधची माेठी कारवाई (पाहा व्हिडिओ)

या समितीच्या अहवालानुसार साई संस्थानच्या तदर्थ समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल केला आहे. आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात साई भक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साई भक्तांची लूट थांबून परिसरातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com