Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सरकारी बंगला केला रिकामा, चावी लोकसभा सचिवालयाला देणार

राहुल गांधी यांनी सरकारी बंगला केला रिकामा, चावी लोकसभा सचिवालयाला देणार
Rahul Gandhi
Rahul Gandhi ANI News

Rahul Gandhi: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना त्यांचा सरकारी बंगला खाली करण्याचा आदेश लोकसभा सचिवालयाने दिला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी गेल्या शुक्रवारीच त्यांच्या सरकारी बंगल्यातून सामान बाहेर नेले होते. आज ते त्यांच्या 12 तुगलक रोडची चावी लोकसभा सचिवालयाला सोपवणार आहे. (Latest Marathi News)

Rahul Gandhi
Gold-Silver Price Today : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ; चांदीत घसरण, पाहा आजचे दर

मिळालेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बरेच सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवलं होतं. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग देखील केलं आहे. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.

दरम्यान, २३ मार्चला सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना ‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णी वर २ वर्षाची सजा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्य पद देखील गेलं होतं.

Rahul Gandhi
Shweta Tiwari Saree Look: लाल साडीत श्वेता तिवारी, दिसते भारी; फोटो पाहून प्रेमात पडाल

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी कर्नाटक येथील एका रॅलीत १३ एप्रिल २०१९ ला ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं?

असं विधान केलं होतं. यावर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर राहुल गांधी यांना न्यायालयाने २ वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com