Pune ATM News  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: अवघ्या दीड मिनिटांत १० लाख चोरले, PDCC बँकेच्या एटीएममधील घटना; पाहा CCTV

Money Stolen at PDCC Bank ATM Pune: पुण्यातील पिडीसीसी बँकेच्या एटीएममधून दहा लाख रुपये लांबवण्यात आलेत. अवघ्या दीड मिनिटांमध्ये १० लाख रुपये चोरून नेण्यात आले.

Priya More

पुण्यामध्ये एटीएममधून पैसे चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १० मिनिटांत चोरांनी एटीएममधील १० लाख रुपये लंपास केले आहेत. मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममध्ये ही चोरी झाली आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. दोन व्यक्ती एटीएममध्ये जाऊन चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पिडीसीसी बँकेच्या एटीएममधून दहा लाख रुपये लांबवण्यात आलेत. अवघ्या दीड मिनिटांमध्ये १० लाख रुपये चोरून नेण्यात आले. चोरीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. २२ नोव्हेंबरला संध्याकाळी ७ वाजता ही घटना घडली.

मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये १० लाखांची चोरी झाली. दोन जणांनी बँकेच्या एटीएममध्ये प्रवेश करून चावीच्या सहाय्याने एटीएमचा दरवाजा उघडून त्यामधील रोख रक्कम लांबवली. याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरने पौड पोलिसात तक्रार दाखल केली.

पौड पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. या एटीएममध्ये १० लाख ८९ हजार ७०० रुपये होते. सगळे पैसे चोरट्यांनी आपल्या बॅगेत भरून लंपास केले आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे विमानतळावर २.२९ करोड रुपयांचा गांजा जप्त

Leopard Attack : राज्यातील बिबट्यांना 1 कोटीच्या बकऱ्यांची मेजवानी; आमदारांना भटक्या कुत्र्यांची भीती, VIDEO

Maharashtra Politics: ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार? सत्ताधाऱ्यांची गुगली,विरोधकांची विकेट

Ambadas Danve: अंबादास दानवेंचा कॅशबॉम्ब,महायुतीत पेटला वाद, शिंदेसेनेच्या आरोपानं राज्यात खळबळ

रेल्वेमधील डुलकी पडली महागात; सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधून व्यापाऱ्याचे साडेपाच कोटींचे सोने चोरीला

SCROLL FOR NEXT