Maharashtra Election Result: पुणेकरांची पसंती कोणाला? पुण्यातील २१ आमदार पाहा एका क्लिकवर
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांचा निकाल अखेर लागला आहे. राष्ट्रवादीचा दबदबा असलेल्या पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघामध्ये एकूण ६१.०५ टक्के मतदान झालं होतं. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून यंदा प्रामुख्याने अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत दिसून आली. पुण्यातील एकूण २१ प्रमुख मतदार संघांमध्ये कसं चित्र दिसून आलं ते पाहूयात.
कसबा
हेमंत रासने भाजप- विजयी
रवींद्र धंगेकर काँगेस - पराभूत
गणेश भोकरे, मनसे - पराभूत
कोथरूड
चंद्रकांत पाटील विजयी
चंद्रकांत मोकाटे, शिवसेना युबीटी - पराभुत
किशोर शिंदे, मनसे - पराभूत
पर्वती
माधुरी मिसाळ,भाजप - विजयी
अश्विनी कदम, राष्ट्रवादी SP - पराभूत
पुणे कॅन्टोन्मेंट
सुनील कांबळे, भाजप - विजयी
रमेश बागवे, काँगेस - पराभूत
वडगाव शेरी
सुनील टिंगरे -राष्ट्रवादी AP पराभुत
बापू पठारे- राष्ट्रवादी SP विजयी
खडकवासला
भीमराव तापकीर, भाजप - विजयी
सचिन दोडके, राष्ट्रवादी SP - पराभूत
मयुरेश वांजळे , मनसे- पराभूत
शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे, भाजप - विजयी
दत्ता बहिरट, काँग्रेस - पराभूत
हडपसर
चेतन तुपे - राष्ट्रवादी AP विजयी
प्रशांत जगताप - राष्ट्रवादी SP पराभूत
साईनाथ बाबर, मनसे - पराभूत
बारामती
अजित पवार राष्ट्रवादी AP -विजयी
युगेंद्र पवार राष्ट्रवादी SP - पराभूत
इंदापूर
दत्ता भरणे, राष्ट्रवादी AP विजयी
हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी SP पराभूत
आंबेगाव
दिलीप वळसे पाटील -राष्ट्रवादी AP विजयी
देवदत्त निकम -राष्ट्रवादी SP पराभूत
जुन्नर
शरद सोनवणे अपक्ष -विजयी
अतुल बेनके अजित पवार गट - पराभूत
सत्यशील शेरकर शरद पवार गट - पराभूत
शिरुर
माउली कटके, राष्ट्रवादी अजित पवार गट - विजयी
अशोक पवार, राष्ट्रवादी शरद पवार गट - पराभूत
पुरंदर
विजय शिवतारे, शिवसेना -विजयी
संजय जगताप, काँग्रेस - पराभूत
भोर
शंकर मांडेकर, अजित पवार गट - विजयी.
संग्राम थोपटे, काँग्रेस - पराभूत.
मावळ
सुनील शेळके अजित पवार गट - -विजयी
बापू भेगडे अपक्ष - पराभूत.
पिंपरी
अण्णा बनसोडे, अजित पवार गट - विजयी
सुलक्षणा शिलवंत, शरद पवार गट - पराभूत
चिंचवड
शंकर जगताप, भाजप - विजयी
राहुल कलाटे, शरद पवार पक्ष - पराभूत
भोसरी
महेश लांडगे, भाजप - विजयी
अजित गव्हाणे, शरद पवार गट - पराभूत
खेड
बाबाजी काळे, शिवसेना UBT - विजयी.
दिलीप मोहिते पाटील अजित पवार गट - पराभूत.
यानंतर पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या माधुरी मिसाळ म्हणाल्या, मला माझ्या मतदारांवर पूर्णपणे विश्वास होता म्हणून मी विजयी झाले. पक्ष ठरवेल मंत्रीपद द्यायचं की नाही पक्षाचा निर्णय हा अंतिम असेल पक्ष जी सांगेल ती जिम्मेदारी मी घेणार आहे. पुण्यात विजयाचं श्रेय आमच्या सर्व महायुतीच्या नेत्यांना देऊ इच्छिते.
भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंतचे कोथरूडमध्ये सर्वोच्च मताधिक्य दिसून आलं. कोथरूड मधील नागरिकांनी पुन्हा कमळ फुलवलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेली अकरा वर्ष देशात काम केलं आहे आणि देशाला आपल्या कुटुंबाचा दर्जा दिला आहे. मोदींमुळे राज्यात आणि देशात परिवारासारखं वातावरण झालं आहे . 18 महिने मी मतदार संघात काम केलं त्याचं श्रेय जनतेने दिला, असं हेमंत रासने यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

