Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Maharashtra Election Result 2024: विधानसभा निडवणुकीचे निकाल हाती आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत लाडक्या मतदारांचे आभार मानले आहेत.
Mahayuti  Press Conference
maharashtra election resultsaam tv
Published On

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. हाती आलेल्या निकालांनुसार, या निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा एकतर्फी पराभव केल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली.

महायुतीचा ऐतिहासिक विजय

हा महायुतीचा ऐतिहासिक विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,' आतापर्यंत अनेक निवडणुका पाहिल्या. परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली. लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला. कारण लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, एकंदरीत सगळ्याच घटकांतल्या लोकांनी यावेळी प्रेम दाखवलं. त्यामुळे मी मतदारांना धन्यवाद देतो. ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घालायला हवं.' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Mahayuti  Press Conference
Maharashtra Election Results : कोण मुख्यमंत्री, कोण आमदार! विधानसभा निवडणूक निकालाआधीच झळकले विजयाचे बॅनर

विकासाला प्राधान्य दिलं..

'गेल्या दोन सव्वादोन वर्षांत आम्ही जे काम केलं. या राज्यात ...शिवसेना भाजप राष्ट्रवादी आरपीआय आणि आमचे इतर घटकपक्ष जे निर्णय घेतले ते न भुतो ना भविष्यती असे होते. विकास केला. मविआ सरकारच्या काळात जी कामे बंद पडली होती. जे स्पीडहब्रेकर होते. ते आम्ही काढले. मग सगळी कामे झाली. अटल, समृद्धी, कोस्टल, मेट्रो आदी कामे झाली. विकासाला प्राधान्य दिले.' असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कल्याणकारी योजना आणल्या..

तसेच ते पुढे म्हणाले, 'कल्याणकारी योजना आणल्या. लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ, तीन गॅस सिलिंडर दिले. शेतकऱ्यांसाठी योजना आणली. पंपाचे वीजबिल माफ केले. आतापर्यंतच्या इतिहासात जितका मोबदला नव्हता तेवढा दिला. विकास आणि कल्याणकारी योजना याचा सांगड घालण्याचा प्रयत्न केला.राज्याला पुढे घेऊन जायचं हाच आमचा उद्देश होता. या राज्यातल्या प्रत्येक घटकाला राज्य सरकारच्या माध्यमातून आधार मिळाला पाहिजे, हाच विचार आम्ही केला.'

Mahayuti  Press Conference
Maharashtra Election Results : बाळासाहेब थोरात, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार पिछाडीवर, टॉप १० मतदारसंघातल्या लढतीत काय स्थिती

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. ज्या प्रकारे विजय दिला आहे, तो एकप्रकारची जबाबदारी वाढवणारा आहे. देशाचे पंतप्रधान मोदींवर जनतेनं जो विश्वास दाखवला आहे. त्यामुळे खूप काम करावे लागेल याची जाणीव होते. त्यांनी जो विश्वास दाखवला आहे त्याला तडा जाऊ देणार नाही, सगळ्यांचे आभार.'

Mahayuti  Press Conference
Maharashtra Assembly Election Result : धाकधूक अन् टेन्शन वाढलं! १०० मतदारसंघात काटें की टक्कर, काहीही होऊ शकतं, कोण ठरणार किंगमेकर?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com