Osmanabad, School Students , fire, police, youth
Osmanabad, School Students , fire, police, youth saam tv
महाराष्ट्र

School Bus : बसनं घेतला पेट, युवकांच्या धाडसानं टळली माेठी दुर्घटना

साम न्यूज नेटवर्क

- कैलास चाैधरी

Osmanabad : उस्मानाबाद शहरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या एका वाहनानं अचनाक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान स्थानिक युवकांनी (youth) तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली. यामुळे विद्यार्थी (students) आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास साेडला. (Osmanabad Breaking News)

शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेची विद्यार्थी वाहतूक करणारी गाडी अरब मस्जिद समोर परिसरात येताच पेट घेतला. ही घटना स्थानिक युवकांनी पाहिली. त्यांनी तत्परता दाखवत गाडीकडं धाव घेतली. त्यानंतर आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

युवकांनी संपुर्णत: आग विझविल्याने मोठी दुर्घटना टळली. या वाहनात सुमारे 20 विद्यार्थी हाेते अशी माहिती उपलब्ध झाली आहे. दरम्यान या संतप्त जमावास वाहतूक पोलीस, शहर पोलीस स्टेशनचे कर्मचाऱ्यांनी पांगवलं.

दरम्यान शहरातील एका शाळेतील वीस पेक्षा अधिक विद्यार्थी या वाहनातून प्रवास करत होते. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या या दुर्घटनाग्रस्त वाहनाची कसलीही नोंद आरटीओ कडे नाही. शाळकरी विद्यार्थी यांची वाहतूक करणारी वाहने अत्यंत जुने आणि भंगार अवस्थेतील असल्याने पालक संतप्त झाले आहेत. या घटनेमुळे शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा पुढे आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amol Kolhe Ahemadnagar | अमिताभ बच्चनला तोडीस तोड डायलॉग!

MI vs SRH,IPL 2024: मुंबईच्या विजयासाठी हैदराबाद सोडून या ८ संघांचे देव पाण्यात! जाणून घ्या कारण

Ravindra Dhangekar: रवींद्र धंगेकरांचा मास्टर प्लान, पुणे शहराचं रुपडंच पालटणार; मतदारांना कोणती आश्वासने दिली?

Amol Kolhe: हमारे पास गाडी, बंगला.. निलेश लंके तुम्हारे पास क्या है? अमोल कोल्हेंचे भाषण अन् टाळ्या, शिट्ट्यांचा पाऊस| VIDEO

Jalna Lok Sabha: 'मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून'; जालन्यात रावसाहेब दानवेंची मिश्किल टिप्पणी

SCROLL FOR NEXT