youth protests in jalna during srpf recruitment know the reason  Saam Digital
महाराष्ट्र

Jalna SRPF GR 03 Recruitment: एसआरपीएफ भरती प्रक्रिया थांबवा, जालन्यात युवकांचा गदाराेळ

Youth protests in jalna during srpf recruitment : सुमारे पाच तासांपासून आम्ही भरती प्रक्रियेबाबत कर्मचा-यांकडे तक्रार करीत आहे. परंतु आम्हांला मॅडम येतील...मॅडम येतील एवढेच उत्तर मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.

Siddharth Latkar

- अक्षय शिंदे

जालना येथे आयाेजिलेल्या एसआरपीएफची भरती प्रक्रिया याेग्य पद्धतीने हाेत नसल्याचा दावा करत आज (मंगळवार) एसआरपीएफ गेटनंबर तीन समोरील रस्त्यावर उमेदवारांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली. ही भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी देखील विद्यार्थ्यांनी साम टीव्हीशी बाेलताना केली.

जालना येथे आज एसआरपीएफची 248 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये मैदानी चाचणी मधील 100 मीटर धावणे क्रीडा प्रकारात गैरप्रकार होत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली. त्यातून काही उमेदवारांनी प्रक्रियेवर शंका व्यक्त केली. यामध्ये बुलढाणा, शनी शिंगणापूर आदी भागातील विद्यार्थ्यांची लक्षणीय संख्या आहे.

युवक म्हणाले आम्ही तक्रार केली त्याला 5 तास उलटून गेले आहेत. एकही अधिकारी आमची तक्रारीची दखल घेण्यासाठी आला नाही. आम्हांला फक्त मॅडम येतील त्यांच्याशी बाेला असं सांगितलं जात आहे. ही भरती प्रक्रिया स्थगित किंवा रद्द करावी अशी आमची मागणी असल्याची युवकांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Haryana: दोन गटात हाणामारी; दगडफेकीनंतर वाहनं पेटवली, अनेकजण जखमी

Vastu Tips For Money: झोपताना उशीखाली ठेवा 'या' गोष्टी, पैशांची होईल भरभराट

Ajit Pawar: राहुल गांधींच्या मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांनी दिलं बारामतीचं उदाहरण, म्हणाले...

Maharashtra Politics: महायुतीत कोंडी, एकनाथ शिंदे अस्वस्थ?पालकमंत्रिपदावरून महायुतीत नाराजी?

BJP : १५ ऑगस्टला चिकन-मटण विक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच, विरोधानंतर सत्ताधारी भाजपचं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT