Manoj Jarange Patil remarks against Eknath Shinde saam tv
महाराष्ट्र

मराठा समाज दुखावला, एकेरी भाषेत बोलाल तर...; मनोज जरांगेंना शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

Manoj Jarange Patil Remarks Against Eknath Shinde Latest News: मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी जरांगेंना एकेरी भाषेत टीका न करण्याचा इशारा दिला.

Omkar Sonawane

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सरकारमधील वाद हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. गेल्या 14 दिवसांपासून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असून ते मुंबईला येण्यावर ठाम आहे. दरम्यान जरांगे पाटील यांनी भाष्य करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख केला होता. यावरूनच आता शिंदेसेना आक्रमक झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केल्यास ती सहन केली जाणार नाही, असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिला आहे. एकनाथ शिंदे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्याने शिवसैनिकांसह राज्यातील सामान्य मराठा समाजही दुखावला असल्याचे कदम यांनी म्हटले.

योगेश कदम म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर करू नये. तुम्ही ज्या भागातून येता, तिथे अशा पद्धतीची भाषा वापरली जात असेल. मात्र अशा भाषेमुळे अनेकांची मन दुखावली जात आहेत. त्यामुळे अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नाही. तसेच मराठा समाजासाठी देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांनी जेवढे काम केले आहे, तेवढे काम कोणीही करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला.

योगेश कदम हे धाराशिव शहरातील के.टी. पाटील शाळेतील एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange: मनोज जरांगेंना मोठा दिलासा, हायकोर्ट म्हणाले- 'त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार'; कोर्टात नेमकं काय घडलं?

कुख्यात ड्रग्स तस्कर ‘जालीम गँग’वर मोक्का! अमजद पठाणसह साथीदारांना पोलिसांचा मोठा दणका

Maharashtra News Live Update: धाराशिवमध्ये योगेश कदमांचा ताफा अडवला; मराठा कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे, जोरदार घोषणाबाजी

Pune : गणेशोत्सवापूर्वी पुण्यात मोठी कारवाई! खवा-पनीरचा तब्बल ३७ लाखांचा साठा FDA कडून जप्त

Skin Care: चेहऱ्यावर हवा इंस्टंट ग्लो आणि थंडावा? घरच्या घरी तयार करा 'हा' फेसपॅक; २० मिनिटांत दिसेल फरक!

SCROLL FOR NEXT