Holi 2022 Saam Tv
महाराष्ट्र

Holi Guidelines: होळी साजरी करताय? तर वाचा सरकारची नियमावली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: होळीच्या सणाची सर्वत्र लगबग सुरु आहे. कोरोनाचे (Corona) निर्बंध (Restrictions) कमी झाले असले, तरीदेखील होळी आणि धुलिवंदनाकरिता राज्य सरकारने (State Government) नवी नियमावली घोषित केली आहे. हे नियम पाळावे लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. रात्री १० वाजेच्या आत होळी करावी तसेच डीजे लावण्यास बंदी घातली आहे. डीजे लावल्यास कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे. होळी (Holi ) साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास देखील कारवाई केली जाणार आहे.

हे देखील पहा-

कोरोना अजून पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. आता उद्या, १७ तारखेला होळीचा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणार आहे. मात्र, या होळी आणि धुळवड सणाच्या निमित्ताने गृहखात्याने नवी नियमावली जारी केली आहे. राज्यामध्ये सध्या १० वी आणि १२ वीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये अशी देखील सूचना देण्यात आली आहे. जोरात लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई केली जाणार आहे.

होळीसाठी सरकारची नियमावली

-रात्री १० वाजेच्या आत होळी करावी

- १० च्या आत होळी लावणे बंधनकारक

-डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर बंदी

-होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई

-महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी

-दहावी आणि बारावीच्या परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई

-कोणत्याही जाती,धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये

-होळीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT