बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; 3 मुन्नाभाई एमबीबीएसवर आरोग्य प्रशासनाची कारवाई

हिंगोली जिल्ह्यात अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ३ बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या पथकाने कार्यवाही करत बनावट कागदपत्रे व औषधे जप्त केली
Hingoli Crime
Hingoli Crimeसंदीप नागरे
Published On

हिंगोली: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात अनाधिकृत वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या ३ बोगस डॉक्टरांवर आरोग्य विभागाच्या (Health Department ) पथकाने कार्यवाही करत बनावट कागदपत्रे व औषधे जप्त केली आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारीअधिकारी संजय दैने यांच्याकडे या बोगस डॉक्टरांच्या विरोधात तक्रारी प्राप्त झाले होते. त्यानंतर प्रशासनाने आदेश देताच आरोग्य विभागाच्या वतीने या डॉक्टरांवर कार्यवाही करण्यासाठी ७ पथके तैनात करण्यात आली होती. (Hingoli 3 bogus doctors exposed Administration action)

हे देखील पहा-

या पथकाने संपूर्ण जिल्ह्यात बोगस डॉक्टर वास्तव्यास असलेल्या ठिकाणी छापेमारी कार्यवाही सुरू केली. यामध्ये वसमत तालुक्यातील हट्टा आरळ व पार्डी गावात बोगस वैद्यकीय व्यवसाय थाटून नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळणाऱ्या ३ मुन्नाभाई एमबीबीएसवर (MBBS) कार्यवाही करण्यात आली असून याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हाधिकारी (Collector) यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Hingoli Crime
"मविआच्या नेत्यांच्या चौकश्या होतात तेव्हा भाजपला गुदगुल्या होतात"- संजय राऊत

यामध्ये वेगवेगळ्या गावातील (village) तिन्ही ठिकाणी असलेल्या क्लिनिकची तपासणी करण्यात आली. या तिघांकडे कोणती कागदपत्रे (Documents) आहेत त्याची सुद्धा आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. परंतु, कोणतीही कागदोपत्री नोंद नसलेले हे मुन्नाभाई रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com