Yavatmal Tragedy Saam
महाराष्ट्र

कार शिकताना भयंकर घडलं; ब्रेकच्या ऐवजी एक्सीलेटर दाबला, ट्रकला जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू

Family of 5 Killed While Daughter Was Learning to Drive: यवतमाळच्या वणी परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. ट्रक आणि कारचा भीषण अपघात. ५ जणांचा मृत्यू.

Bhagyashree Kamble

  • यवतमाळच्या वणी परिसरात भीषण अपघात.

  • कार अन् ट्रकची धडक.

  • वडील अन् चार मुलींचा जागीच मृत्यू.

संजय राठोड, साम टिव्ही

यवतमाळ जिल्ह्यातील वणी घुग्गुस मार्गावर एक ह्रदयद्रावक अपघाताची घटना घडली. कार आणि ट्रकचा भीषण अपघात घडला. या भीषण धडकेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाला. हा भीषण अपघात जन्नत सेलिब्रेशन हॉलपासून काही अंतरावर घडला. मुलीला कार शिकवताना हा दुर्देवी प्रसंग घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वणीतील लालपुलिया परिसरात राहणारे रियाज शेख हे व्यावसायिक ट्रक दुरूस्तीचे काम करीत होते. त्यांचे स्वत:चे गॅरेज होते. ते आपल्या मुलीला कार चालविण्याचं प्रशिक्षण देत होते. कार शिकवण्यासाठी ते आपल्या मुलीला घुग्गुस मार्गावर घेऊन गेले होते. दरम्यान, जन्नत हॉलजवळ मुलीचे कार चालवताना नियंत्रण सुटले. तिनं ब्रेकऐवजी एक्सीलेटर दाबलं.

कार थेट दुभाजकावरून उसळून महामार्गाच्या विरूद्ध दिशेनं गेली. तसेच समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. कारचा समोरील भाग अक्षरश: चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील ४ मुलींचा मृत्यू झाला. तर, रियाज यांचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये रियाज यांच्या भावाच्या मुलाचाही समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मायरा शेख (वय वर्ष १७), अनिबा (वय वर्ष ११), झोया (वय वर्ष १३), लियाबा आणि रियाज (वय वर्ष ५४) अशी मृतकांची नावे आहेत.

मुलीला कार चालविताना काळाने घाला घातल्यानं वणी शहरात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Arya Encounter Mystery: रोहित आर्यचा एन्काऊंटर की हत्या? रोहितच्या वकिलाच्या दाव्यानं खळबळ

Sikandar Shaikh Arrest: पहिलवान सिकंदर शेखला अटक; पोलिसांच्या कारवाईने कुस्ती क्षेत्रात खळबळ|VIDEO

Mumbai Crime : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई; बीएमसी अधिकाऱ्याला रंगेहाथ अटक

वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताची धडक, 7 वेळा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाला चारली धूळ

Crime News : आई की कसाई? बॉयफ्रेंडसाठी एकुलत्या एक मुलाची हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT