Yavatmal News Saam tv
महाराष्ट्र

Yavatmal : तलठ्याची शेतकऱ्यांशी अरेरावी; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, अतिवृष्टीच्या यादीवरून वाद

Yavatmal News : ठाणकी येथील तलाठी भोजने हे नेहमीच उद्धटपणे बोलत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. शहरातील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण फुलकोंडवार यांचे अतिवृष्टी अनुदान यादीतून नाव वगळण्यात आले होते

Rajesh Sonwane

संजय राठोड 

यवतमाळ : राज्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे पंचनामे करून अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणार आहे. यासाठी स्थानिक पातळीवर तलाठ्यांमार्फत पंचनामे करून याद्या तयार केल्या जात आहे. मात्र अतिवृष्टी यादीतून एखाद्या शेतकऱ्याचे नाव सुटले तर काही फरक पडत नाही; असा उद्धट सवाल तलाठ्याने शेतकऱ्याला करत अरेरावी केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ठाणकी येथे हा प्रकार समोर आला असून तलाठ्याने शेतकऱ्यांसोबत घातलेल्या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाणकी येथील तलाठी भोजने हे नेहमीच उद्धटपणे बोलत असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या आहेत. शहरातील शेतकरी दत्तात्रय लक्ष्मण फुलकोंडवार यांचे अतिवृष्टी अनुदान यादीतून नाव वगळण्यात आले होते. याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांचा मुलगा तलाठी कार्यालय गेला त्यादरम्यान तलााठी यांनी शेतकरी पुत्राचा अपमान केला.

तलाठ्यावर कारवाईची मागणी 

एका शेतकऱ्याचे नाव यादीतून वगळले, तर काही फरक पडत नाही. तुला काय करायचे आहे ते करून घे; अशा शब्दात त्यांचा अपमान केला. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतं आहे. यामुळे ठाणकी परिसरात संबंधित तलाठ्याविरुद्ध संतापाची लाट आहे. तसेच संबंधित तलाठ्यावर कारवाईची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

शेतकरी अडचणीत 

सततचा पाऊस तसेच अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून सरकारकडून नुकसानीची मदत करण्याची मागणी करण्यात येत आहे. अशात पंचनामे करताना एखाद्या तलाठ्याकडून शेतकऱ्याशी अशा पद्धतीने संवाद साधल्याने शेतकर्यांमध्ये संतापाची लाट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thurday Horoscope : मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार नवं वळण

OBC Reservation : लक्ष्मण हाकेंनी सरकारविरोधात दंड थोपटले; आंदोलनातून आंदोलनाला प्रत्युत्तर देणार, VIDEO

Shukra Gochar 2025: 27 महिन्यांनी शुक्र करणार बुधाच्या नक्षत्रात प्रवेश; 'या' राशींना आहेत धनलाभाचे योग

Satara Gazetteer : सातारा गॅझेटियर नेमकं आहे तरी काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

Narayan Rane: मोठी बातमी! नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT