Maratha Reservation : सिरसममध्ये बाजारपेठ कडकडीत बंद; मराठा आरक्षणाच्या मागणीच्या आंदोलनाला पाठिंबा

Hingoli News : आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील काही भागात मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात देखील मराठा बांधव एकत्र आला आहे
Maratha Reservation
Maratha ReservationSaam tv
Published On

हिंगोली : मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे. मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले असून आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांचे सरकारकडून हाल होत असल्याने हिंगोलीत आज मराठा बांधवांनी सिरसम येथील बाजारपेठ बंद ठेवत निषेध करण्यात आला आहे.  

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनासाठी मराठा समाज मोठ्या संख्येने मुंबई दाखल होऊन एकवटला आहे. तर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील काही भागात मराठा समाज बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात देखील मराठा बांधव एकत्र आला आहे. 

Maratha Reservation
Amravati Airport : मुंबईसाठी उड्डाण पुन्हा सुरु; आठ दिवसांपासून बंद होती विमानसेवा

बाजारपेठे शुकशुकाट 

सोमवारी सिरसममध्ये बाजारपेठेमुळे लगबग सुरू असते. मात्र ऐन लक्ष्मी सणाच्या दिवशीच ही बाजारपेठ बंद करण्यात आल्याने येथे सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबईत सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांचे हाल होत असल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी हा बंद पाळण्यात येत आहे. मराठा बांधवांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूरपणे प्रतिसाद देत ही बाजारपेठ बंद ठेवल्याचं दिसले आहे. 

Maratha Reservation
Pune Crime : महिलांचा वेश करून कंपनीमध्ये चोरी; पुण्यातील धक्कादायक प्रकार, सराईत चोरटे अटकेत

आरक्षणाच्या लढ्याला बळ मिळण्यासाठी महागणपतीला साकडं
पुणे : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचा लढा लढत असताना मराठा आंदोलनाला बळ मिळावे आणि जरांगे पाटलांची प्रकृती स्थिर राहावी; यासाठी रांजणगाव महागणपतीला सकल मराठा समाजाच्या वतीने महाआरती करण्यात आली. आरक्षणाचा लढा यशस्वी व्हावा, अशी सामूहिक प्रार्थना या वेळी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com