Crime Saam Tv
महाराष्ट्र

Crime: मायलेकीला खोलीत डांबून ठेवलं, भोंदूबाबाकडून अंगावर चटके देत अमानुष मारहाण; यवतमाळमध्ये खळबळ

Yavatmal Police: यवतमाळमध्ये भयंकर घटना घडली. मायलेकींना घरात डांबून ठेवत भांदूबाबाने त्यांच्यासोबत अघोरीकृत्य केले. या दोघींना चटके देत अमानुष मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे यवतमाळमध्ये खळबळ उडाली.

Priya More

संजय राठोड, यवतमाळ

यवतमाळमध्ये मायलेकीवर अघोरी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतमाळ शहरातील वंजारी फैलात एका घरात ही घटना घडली. शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी मायलेकीसाठी यातनागृह तयार करण्यात आले होते. दरम्यान या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भोंदू महादेव परसराम पालवेविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महादेव उर्फ माऊली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदूबाबाने स्वतःच्या घरात बुवाबाजीचे दुकान थाटले होते. त्याने विभक्त राहणाऱ्या नीतू जयस्वाल या महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर दृष्टात्म्याचा प्रभाव पाडला असे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे सांगत घरी आणले. नीतू जयस्वाल यांच्यासोबत त्यांची १४ वर्षांची मुलगीसुद्धा भोंदू बाबाकडे राहू लागली. सुरुवातीला या दोन्ही मायलेकी अतिशय धष्टपुष्ठ आणि मानसिक दृष्ट्या स्थिर दिसत होत्या असे शेजाऱ्यांकडून पोलिसांना कळाले.

या भोंदूबाबाने या मायलेकीवर नंतर आघोरी उपचार सुरू केले. त्या दोघींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्र्याची खोली तयार केली. या खोलीतच दिवस रात्र या मायलेकी राहत होत्या. त्यांना शौच, लघुशंकेसाठी बाहेर पडण्याची जागा देखील नव्हती. तेथेच त्यांना हा विधी करावा लागत होता. उपचाराच्या नावाखाली महादेव त्या मायलेकींना गरम सळईचे चटके देत होता. त्यांना अमानुष मारहाण करत होता. त्या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमा पोलिसांना आढळून आल्या आहेत.

मायलेकीना पोलिसांनी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले. त्या दोघींवर आघोरी उपचारासोबतच भोंदूबाबाने शारीरिक अत्याचार केले का? याचीही तपासणी केली जाणार आहे. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून भोंदूबाबाविरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भोंदूबाबाच्या घराची पोलिसांनी पंचासमक्ष झडती घेतली. यामध्ये पोलिसांना जवळपास ८ लाखांची रोख रक्कम मिळाली. यासोबतच आघोरी पूजेसाठी भोंदूबाबाकडून वापरले जाणारे अनेक प्रकारचे साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले. भोंदूबाबाने घरातच खड्डा का खोदला होता याचा तपास पोलिस करत आहेत.

पोलिस पथकाच्या कारवाईदरम्यान भोंदूबाबा महादेव पालवेने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून घेतला. पोलिसांनी त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. गळ्यावर मोठी जखम असल्याने डॉक्टरांनी महादेवला उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पोलिसांना अटकेच्या कारवाईसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. या प्रकारामुळे यवतमाळ शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : माझ्या परवानगीशिवाय कोणाशी बोलू नका, राज ठाकरे यांचा पदाधिकाऱ्यांना आदेश

Pune News : चिमुरडीचा जीव वाचवणारा, फायर ब्रिगेडचा हिरो

Morning Weight loss Drink: रिकाम्या पोटी प्या 'हे' मॉर्निंग सुपरड्रिंक, वजन होईल कमी

मीरारोडला गर्जला मराठी; दिवसभरात नेमकं काय घडलं? मराठीचा एल्गार, मोर्चापूर्वी काय घडलं?

Mumbai Local : 'ऑफिसच्या वेळा बदला' 800 कार्यालयांना मध्य रेल्वेचं विनंतीपत्र, गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेची धडपड

SCROLL FOR NEXT