yavatmal saam tv
महाराष्ट्र

Yavatmal Reliance च्या Smart Superstore मध्ये सडक्या अन्नधान्याची विक्री, अन्न व औषधची माेठी कारवाई (पाहा व्हिडिओ)

Yavatmal Reliance Smart Store News: या कारवाईमुळे अयोग्य अन्न पदार्थ विक्रीकरीता ठेवणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ येथील रिलायन्स मार्टला फूड अँड ड्रॅगजच्या पथकाने (food and drug administration yavatmal) दिलेल्या भेटीनंतर तेथील खराब झालेले शेंगदाणे, काबुली चणे हे विक्रीसाठी ठेवल्याचे पथकास आढऴले. त्यामुळे विक्रीसाठी ठेवण्यात आलेला सर्व खराब मालाचा साठा अधिका-यांनी जप्त केला आहे. ही कारवाई (गुरूवार, ता. २० एप्रिल) दुपारच्या सुमारास करण्यात आली. ही कारवाई फूड अँड ड्रॅगजचे अन्न सुरक्षा अधिकारी जी. पी. दंदे व गोपाल माहोरे यांच्या पथकाने केली. (Maharashtra News)

दरम्यान या कारवाईपुर्वीचा माॅलमधील व्हिडिओ आकाशवाणी नागपूरने ट्विट केला आहे. या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनूसार गुरुवारी दुपारी अचानक अन्न सुरक्षा अधिकारी हे रिलायन्स मार्ट स्टोअरमध्ये आले. यावेळी विक्रीकरीता ठेवण्यात आलेले धान्य तपासले. यामध्ये दाेन कंपन्यांचे पाकीटबंद शेंगदाणे त्यांना पुर्णपणे खराब झालेले दिसून आले.

दोन्ही ब्रँन्डचे एक-एक पाकीट उघडुन पाहिले असता त्यामध्ये कुजलेले शेंगदाणे आणि कीटकाची जाळी जळमटे मोठ्या प्रमाणात आढळुन आली. तसेच कीटकांनी अर्धवट कुडतडलेल्या दाण्यांची संख्याही मोठी आढळुन आली.

त्यामुळे प्रत्येक ब्रँन्डचे ४-४ पाकीट नमुण्या करीता घेण्यात येवुन उर्वरीत साठा जप्त करण्यात आला. त्यानंतर स्टीलच्या कोठीमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले खुले शेंगदाणे देखील मोठ्या प्रमाणात कीड्यांची जाळी लागलेली दिसुन आली. काही दाने कीड्यांनी कुरतडलेले आणि भुंगा लागलेले आढळले. त्यापैकी २ किलो शेंगदाणे नमुण्याकरीता घेवुन उर्वरीत साठा अधिकारी यांनी जप्त केला.

त्याच्या शेजारी स्टीलच्या कोठीमध्ये विक्रीसाठी ठेवलेले काबुली चणे तपासले असता त्यात मोठ्या प्रमाणात भुंग्यांची छीद्रे असुन त्यात जीवंत कीडे फिरत असलेले आढळुन आले. त्यापैकी २ किलो चणे नमुण्याकरीता घेवुन उर्वरीत साठा जप्त करण्यात आला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT