Kisan Sabha Long Morcha News : राज्यभरातील शेतकरी काढणार अकोले ते लोणी ‘लाँग मार्च’ (पाहा व्हिडिओ)

राज्यातील देवस्थानच्या शेतजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात अशी शेतक-यांची मागणी आहे.
Kisan Sabha Long Morcha News, Dr. Ajit Navale
Kisan Sabha Long Morcha News, Dr. Ajit Navale saam tv
Published On

- सचिन बनसाेडे

Kisan Sabha Long March : शेतकऱ्यांच्या रखडलेल्या विविध प्रश्‍नांकडे (Farmers Issue) सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अकोले ते महसूल व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (radhakrishna vikhe patil) यांचे गाव असलेल्या लोणी (ता. राहाता) असा तीन दिवसांचा शेतकरी पायी ‘लाँग मार्च’ काढणार आहेत. हजाराे शेतकरी यामध्ये सहभागी हाेणार असल्याची माहिती किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले (dr. ajit navale) यांनी दिली. (Breaking Marathi News)

Kisan Sabha Long Morcha News, Dr. Ajit Navale
Rajaram Sahakari Sakhar Karkhana Election News : ‘राजाराम’साठी आज सत्ताधारी, विराेधी पॅनेलची बालेकिल्ल्यात सभा; रविवारी मतदान

अखिल भारतीय किसान सभा या लाँग मार्चचे नेतृत्व करणार आहे. या लाँग मार्चबाबत किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले किसान सभेच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपूर्वी राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांनी मुंबईपर्यंत लाँग मार्च काढला होता. त्यानंतर आता २६ एप्रिलपासून (ता. 28 पर्यंत) अकोले ते लोणी (ता. राहाता) येथे शेतकरी पायी लाँग मार्च काढणार आहेत.

Kisan Sabha Long Morcha News, Dr. Ajit Navale
Success Story : दाेनदा अपयश येऊनही आडळकर खचले नाही, हळदीतून एकरी अडीच लाखाचे मिळवले उत्पन्न; सेंद्रिय शेती प्रयोग केला यशस्वी

दुधासंदर्भात गांभीर्याने घेतले पाहिजे

डॉ. अजित नवले यांनी दूध उत्पादकांबाबत सरकार फारसे गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप केला. ‘महानंद’ बरखास्त करणे म्हणजे जबाबदारी संपली असे नाही. दुधाला ‘एफआरपी’ मिळावी ही जुनी मागणी आहे. त्याबाबत कोणीही बोलायला तयार नाहीत. दूध व्यवसायावर लाखो कुटुंबे अवलंबून आहेत. त्यामुळे दुधाचा प्रश्‍न सुटला पाहिजे. दुधासंदर्भात गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे डॉ. नवले यांनी नमूद केले.

Kisan Sabha Long Morcha News, Dr. Ajit Navale
Mla Nitin Deshmukh Sangharsh Yatra : देवेंद्र नहीं तो मोदी सही ! सरकारच्या दडपशाहीला घाबरणार नाही : आमदार नितीन देशमुख

राज्यातील देवस्थानच्या शेतजमिनी शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात अशी शेतक-यांची मागणी आहे. काही दिवसांपूर्वी काढलेल्या लाँग मार्चनंतर सरकारने त्या संदर्भात कायदा करण्याचे आश्‍वासन दिले हाेते. कायदा होईल, परंतु तो जर विश्‍वस्तांच्या बाजूने झाला तर पुन्हा शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे कायदा करताना शेतकऱ्यांचे म्हणणेही एकून घेतले पाहिजे अशी भावना शेतक-यांची आहे.

असा असेल लॉंगमार्च

दिवस पहिला - २६ एप्रिल

- राज्यभरातून आलेले शेतकरी आणि किसान सभेचे कार्यकर्ते सकाळी १०. वा अकोले ( जि. अहमदनगर ) येथे जमतील.

- लॉंगमार्चची लोणीकडे कूच

- १० किमी अंतर चालल्या नंतर दुपारचे जेवण ( रामेश्वर मंदिर परिसर )

- पुन्हा मार्गस्थ आणि ११ किमी चालल्यानंतर संगमनेर जवळ ( रात्री ) पहिला मुक्काम

दिवस दुसरा २७ एप्रिल -

- १० किमी चालल्यानंतर जेवण

- पुन्हा मार्गस्थ आणि १३ किलोमीटर चालल्यानंतर निमगाव जाळी येथे ( रात्री ) दुसरा मुक्काम

तिसरा दिवस २८ एप्रिल -

- निमगाव जाळी येथून लोणीकडे प्रयाण आणि दुपारपर्यंत लॉंगमार्च महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी धडकणार.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com